गुन्हेगारांवर मोठी कारवाई!
पिंपरी - चिंचवडमधून तब्बल २६ गुन्हेगार तडीपार

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चिखलीतील आठ, महाळुंगे एमआयडीसी मधील तीन, एमआयडीसी भोसरी मधील ११, दिघी मधील तीन तर चाकण मधील एक अशा एकूण २६ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याच्यासह यामध्ये १८ जणांना दोन तर आठ जणांना एका वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड
यांनी दिले आहेत.
परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी याबाबत माहिती दिली.महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील शरद ज्ञानेश्वर मोरे (वय २७, रा. मुळशी) याला दोन वर्षांसाठी तर स्वयम सबाजी सावंत (वय २७), सोनू बहिरू केदारी (वय २९, रा. खेड) या दोघांना एक वर्षासाठी तडीपार केले आहे. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संग्राम दत्तात्रय पवार (वय २९, रा. चिखली),आकाश उर्फ सुमित उर्फ आक्या बॉण्ड पांडुरंग मोहळ (वय १९, रा. चिखली),सुमित गणेश पिल्ले (वय ३२), कनिष्काराज उर्फ राणा अरुण सुरवसे (वय २१, रा. चिखली), कुणाल बाळकृष्ण भंडारी (वय २३, रा. मोईगाव, खेड) यांना दोनतर तेजस निलेश गायकवाड (वय २०), रोहन शंकर पंडित (वय २३, रा. चिखली)यांना पुणे जिल्ह्यातून आणि मारुती मांजरीया राठोड (वय ४५, रा. निगडी) याला एक वर्षासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून तडीपार केले आहे. एमआयडीसी भोसरी येथील जीके उर्फ गणेश संतोष कोठावळे (वय १९, रा. चिखली) याच्या टोळीला दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. टोळीतील सदस्य ससा उर्फप्रतीक वैâलास गजरमल (वय १९, रा. चिंचवड), रोहित राजू बजलव (रा. चिखली), व्ही. पी. उर्फ विशाल हनुमंत पोळ (वय २१, रा. चिखली), बच्चा उर्फ दिग्विजय अनंत गायकवाड (वय १९, रा. चिंचवड) यांच्यावर कारवाई झाली आहे. या टोळीवर गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. केतन सोनवणे उर्फ चेप्या (वय २६, रा. पिंपरी), सचिन बाळू धांडे (वय २०), दीपक गोरख धांडे (वय २४), राहुल भारत जाधव (वय २०) यांना दोन वर्षांसाठी तर विजय बाळासाहेब साळवे (वय २२, रा. मोशी), ज्ञानेश्वर वसंत दुनघव (वय २२) यांनाएक वर्षासाठी तडीपार केले आहे.
हेही वाचा – माओवादी चळवळीचा अंत निश्चित : माओवादी प्रभाव संपवण्यासाठी विकास आणि विश्वासाचं सूत्र!
दिघी पोलीस ठाण्यातील गजानन गोविंद भोसले (वय २८, रा. लोहगाव), जयंता हरिपद सरकार (वय २९, रा. दिघी), अक्षय नंदू पठारे (वय २०, रा. चर्होली), चाकण पोलीस ठाण्यातील आरोपी महिला नंदा रंगनाथ साळुंके (वय ५०, रा. चाकण) या आरोपींना दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. नंदा साळुंके हिच्यावर गांजा विक्री प्रकरणी चार गुन्हे दाखल आहेत. जानेवारी ते मे या कालावधीमध्ये परिमंडळ तीनमधून ९१ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच, १०० पेक्षा अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे
बारकाईने लक्ष असल्याचे उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.