Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माओवादी चळवळीचा अंत निश्चित : माओवादी प्रभाव संपवण्यासाठी विकास आणि विश्वासाचं सूत्र!

औद्योगिक विकासालाही चालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली दौरा

गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि सीमावर्ती भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दौरा केला. “गडचिरोलीत माझ्या एवढा फिरलेला दुसरा मुख्यमंत्री नसेल,” असं सांगत त्यांनी आपल्या सातत्यपूर्ण उपस्थितीवर भर दिला आणि माओवादी चळवळीचा पूर्णपणे अंत करण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी कवंडे येथील पोलिस आऊटपोस्टला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सुरक्षादलांच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि स्थानिक पातळीवर शासकीय योजनांची अंमलबजावणी सुरू झाल्याचा उल्लेख केला. “आता या भागात माओवादी कारवाया शक्य होणार नाहीत,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

या दौऱ्यातील एक महत्त्वपूर्ण घडामोड म्हणजे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा सामूहिक विवाह सोहळा. गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस साक्षीदार म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात ‘मोस्ट वॉन्टेड’ नक्षली गिरीधर याचाही समावेश होता. पोलीस बँड पथकाच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडला, आणि सामाजिक पुनर्वसनाचा एक सकारात्मक संदेश दिला गेला.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवडमधील वकीलाचा ‘‘मुळशी पॅटर्न’’ : कासारसाई येथील घटनेमुळे खळबळ!

मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीतील विकासाचाही आढावा घेतला. त्यांनी स्पष्ट केलं की, “गडचिरोलीच्या जल, जंगल आणि जमिनीचे संवर्धन करतच औद्योगिक विकासाला चालना दिली जाणार आहे.” स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि विकास प्रक्रियेत त्यांचा सक्रीय सहभाग असावा, यावर त्यांनी भर दिला.

या दौऱ्याने गडचिरोली जिल्ह्यातील विकासाच्या नव्या दिशा निश्चित केल्या असून, माओवादी विचारसरणीच्या विरोधात सरकारने उचललेले टप्प्याटप्प्याचे पावले आता फळ देताना दिसत आहेत. विकास आणि शांततेच्या दिशेने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“गडचिरोलीत माझ्या एवढा सातत्याने फिरलेला दुसरा मुख्यमंत्री नसेल. इथल्या जनतेशी थेट संवाद साधत मी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. राज्य सरकारकडून विविध योजना आता या दुर्गम भागात पोहोचत आहेत. त्यामुळे माओवादी कारवाया आता टिकू शकणार नाहीत. हे क्षेत्र आता विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जात आहे.”

– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button