प्रा. सारिका हेमंत गाडेकर यांना संगणकशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान
शिक्षण विषय: एमआयटी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाकडून कौतुक

पिंपरी चिंचवड : एमआयटी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक सारिका हेमंत गाडेकर यांना डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यापीठ इंदूर यांनी संगणकशास्त्र विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजेच पीएचडी ही पदवी प्रदान केली आहे.
त्यांचे संशोधन मार्गदर्शन डॉ अर्पणा भराणी यांनी केले आहे. त्यांच्या प्रबंधाचा विषय “डेटा सिक्युरिटी एनहॅन्समेंट इन पब्लिक क्लाऊड स्टोरेज युजिंग डेटा ऑब्फ्युसेशन अँड स्टेगनोग्राफी”असा आहे. या संशोधनामध्ये डॉ. गाडेकर यांनी सार्वजनिक क्लाऊड संचयनातील डेटाच्या सुरक्षेसाठी टू वे क्लाऊड सिक्युरिटी फ्रेमवर्क विकसित केले आहे. या फ्रेमवर्कद्वारे डेटा निर्माण देखभाल पुनर्प्राप्ती आणि विलोपन या सर्व टप्प्यांवर डेटाचे सुरक्षित संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी डेटा ऑब्फ्युसेशन आणि स्टेगनोग्राफी या तंत्रज्ञानांचा एकत्रित वापर करण्यात आला आहे.
हेही वाचा – डॉ.माधुरी अभिजीत दरेकर यांना संगणकशास्त्र विषयातील पीएचडी पदवी प्रदान
या संशोधनातून डेटा संरक्षण कसे बळकट करता येते यावर सखोल अभ्यास करण्यात आला आहे. डॉ गाडेकर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.




