Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई

पिंपरी : देशाचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाली. तिरंगा रंगसंगतीतील दिव्यांच्या सजावटीमुळे संपूर्ण इमारत लक्षवेधी आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारी दिसून येत आहे.

इमारतीच्या दर्शनी भागावर तसेच सभोवतालच्या परिसरात हिरवा, पांढरा आणि केशरी रंगातील एलईडी दिव्यांची भव्य मांडणी करण्यात आली आहे, ज्यामुळे परिसर अधिकच तेजस्वी व प्रेरणादायी झाला आहे. या रोषणाईमुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक नागरिक इमारतीसमोर थांबून छायाचित्रे काढत आहेत. महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

हेही वाचा –बोटावरील शाई हेच सन्मानचिन्ह! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय मतदार दिनी तो मोठा संदेश

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी देशभक्तीपर कार्यक्रम, ध्वजारोहण आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या या रोषणाईमुळे पिंपरी-चिंचवड शहरात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव अधिकच दिमाखात साजरा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button