Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

IPL Final नंतर गुजरात टायटन्सच्या खेळाडूंच्या बसला आग; सर्व खेळाडू सुरक्षित

IPL Final 2026 | आयपीएल २०२६ च्या महाअंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यानंतर, गुजरात टायटन्सच्या (GT) खेळाडूंना एका अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रसंगाला सामोरे जावे लागले. फायनल मॅच संपवून नरेंद्र मोदी स्टेडियमवरून हॉटेलकडे परतत असताना गुजरात टायटन्सच्या संघ बसमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याची मोठी घटना रविवारी रात्री घडली. बसमध्ये अचानक मोठ्या प्रमाणावर धूर पसरल्याने एकच खळबळ उडाली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधील इलेक्ट्रिकल बिघाडामुळे अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि पाहता पाहता गाडीच्या आत दाट धूर पसरला. बसमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने कमालीची तत्परता दाखवली आणि गाडी तातडीने रस्त्याच्या कडेला थांबवली. संघ व्यवस्थापन आणि चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही दुखापत न होता सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला तातडीने बसमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. चालक आणि कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

हेही वाचा

केंद्र सरकारचा मोठा निर्णय.! वस्त्रोद्योग उद्योगाला मोठा दिलासा

गुजरातचे स्टार खेळाडू पाऊण तास रस्त्यावर

या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे गुजरात टायटन्सचे खेळाडू आणि कर्मचारी जवळपास पाऊण ते एक तास रस्त्याच्या कडेलाच अडकून पडले होते. रात्रीच्या वेळी संघातील आंतरराष्ट्रीय आणि भारतीय स्टार खेळाडू रस्त्यावर उभे असल्याचे पाहून परिसरात काही काळ चर्चा रंगली होती. या घटनेची माहिती मिळताच तातडीने दुसऱ्या पर्यायी बसची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर सर्व खेळाडूंना सुरक्षितपणे हॉटेलकडे रवाना करण्यात आले.

प्राथमिक तपासात बसच्या अंतर्गत वायरिंगमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळेच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अंतिम सामन्यातील पराभवाच्या पाठोपाठ घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे गुजरातच्या खेळाडूंना मानसिक धक्का बसला असला, तरी सर्व जण पूर्णपणे सुखरूप असल्याने व्यवस्थापनाने सुटकेचा श्वास सोडला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button