Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

भाजपाकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर, प्राजक्त तनपुरेंसह ११ नावांची घोषणा

मुंबई  : राज्याच्या राजकारणात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरू होता. कोणता पक्ष किती जागा लढवणार? याबाबत चर्चा सुरू होत्या. आता अखेर महायुतीचा तिढा सुटला असून विधानपरिषदेच्या १७ जागांपैकी ११ उमेदवारांची घोषणा भाजपाने केली आहे.

भाजपाने कोणत्या ११ उमेदवारांची घोषणा केली?

अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे

भंडारा-गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर

अमरावती : प्रविण पोटे पाटील

सांगली-सातारा : धैर्यशील कदम

सोलापूर : राजेंद्र राऊत

नांदेड : अमर राजूरकर

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : अरुण लखानी

धाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटील

नागपूर : डॉ.राजीव पोतदार

जळगाव : नंदकिशोर महाजन

छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट

हेही वाचा –  ‘अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाने अंगीकारण्याची गरज’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरू होता. यानंतर अखेर महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला आहे. विधानपरिषदेच्या १७ जागांपैकी भाजपा ११ जागा लढवणार, तर शिवसेना शिंदे ४ जागा लढवणार आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष २ जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राजक्त तनपुरे यांनी नुकताच मुंबईत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. भाजपात प्रवेश केल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून भाजपाकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर आज (३१ मे) भाजपाकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत प्राजक्त तनपुरे यांच्यासह राज्यातील ११ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षामधून नुकताच भाजपात प्रवेश केला. गेल्या काही महिन्यांपासून प्राजक्त तनपुरे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली होती. एवढंच नाही तर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीमधून उमेदवारी मागे घ्यावी म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीच्या पोटनिवडणुकीमधून माघार घेतली होती. त्यानंतर ३० मे रोजी अखेर प्राजक्त तनपुरे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे यांच्यासह आदी नेत्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज (३१ मे) प्राजक्त तनपुरे यांना भाजपाकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button