Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

राज्य बेवड्यांच्या हातात दिल्यावर असेच होणार : भाजपा नेत्या चित्रा वाघ

मुंबई । प्रतिनिधी

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. १००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन विक्री करता येणार आहे.

याबद्दल बोलताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले, महाराष्ट्रात बऱ्याच वाईनरी असताना आता १००० चौरस फुटांच्या छोट्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर वाईनरी चालते. त्यांना चालना देण्यासाठी वाईन विक्री करता येणार आहे.

दरम्यान, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी या मुद्यावरुन राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

राज्यात आधी दारू स्वस्त केली आणि आता किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. राज्यातील तरुणाईला व्यसनाधीनतेची चटक लावणारा हा निर्णय आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने बेधुंदावस्थेत हा निर्णय घेतला आहे का? असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

तसेच,  राज्य बेवड्यांच्या हातात दिल्यावर असेच होणार…अशा शब्दांत या निर्णयाचा निषेधही चित्रा वाघ यांनी  नोंदवला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button