Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचा आदेश

पिंपरी | पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळण्यासाठी तसेच अशी परिस्थिती हाताळण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवला असून महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उप आयुक्त व सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद मिळावा, यासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महापालिकेने जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे की, पावसामुळे शहरात गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्तांचे रक्षण करणे आणि नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचविणे आवश्यक आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उपआयुक्त व सहाय्यक आयुक्त या पदावरील अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

हेही वाचा   :    राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा 

नोडल अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई यासारख्या कामकाजाची अंमलबजावणी विहित कालावधीत पूर्ण व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील पूरनियंत्रण आराखड्यानुसार आपत्ती व्यवस्थापन, स्थापत्य, पाणीपुरवठा, आरोग्य, अग्निशमन, वैद्यकीय व विद्युत विभागाशी समन्वय साधून पूरनियंत्रण व आपत्कालीन सेवा सुरळीतपणे पार पाडाव्यात, असे आयुक्त सिंह यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या आदेशात नमूद केले आहे.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय नियुक्त नोडल अधिकारी व त्यांचे संपर्क क्रमांक-

  • सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे – अ क्षेत्रीय कार्यालय – ९४२३००६५७५
  • उप आयुक्त निलेश भदाने – ब क्षेत्रीय कार्यालय – ७७३८३९४६२१
  • उप आयुक्त अण्णा बोदडे – क क्षेत्रीय कार्यालय – ९९२२५०१९४२
  • उप आयुक्त पंकज पाटील – ड क्षेत्रीय कार्यालय – ८३८०८१७८०६
  • उप आयुक्त ममता शिंदे – इ क्षेत्रीय कार्यालय – ८४५९५३१५२०
  • उप आयुक्त सिताराम बहुरे – फ क्षेत्रीय कार्यालय – ७७२२०६०९२७
  • उप आयुक्त संदीप खोत – ग क्षेत्रीय कार्यालय – ७७२२०६०९२६
  • सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे – ह क्षेत्रीय कार्यालय – ८८३०८२९०११

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button