शैक्षणिक सहलीतून इतिहास जागवण्याचा प्रयत्न!
शिक्षण विश्व : रामकृष्ण मोरे महाविद्यालयाची शैक्षणिक सहल

पिंपरी-चिंचवड : प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाची शैक्षणिक सहल(सातारा) मा.प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आली. मा.प्राचार्य आणि उपप्राचार्य डॉ. सोनावणे सर यांनी ऐतिहासिक स्थळांना भेटी दरम्यान घ्यावयाची काळजी आणि त्या स्थळांचे पावित्र्य राखण्याचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले.
सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा (स्वराज्याची चौथी राजधानी), छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, संगम माहुली (महाराणी येसूबाई आणि छत्रपती थोरले शाहू महाराज समाधी) या मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक स्थळांना भेट देवून त्यांचे महत्व समजून घेतले. विद्यार्थ्यांमध्ये या सहलीच्या माध्यमातून छत्रपतींचे कार्य आणि महत्व तसेच त्यांच्या आदर्शांचा प्रभाव या सहलीच्या माध्यमातून करून देण्यात आला. “या सहली दरम्यान विद्यार्थ्यांना आपल्या ऐतिहासिक वारस्याचे जतन व संवर्धन पुढील पिढी पर्यंत कसे करावे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. अविनाश काळे यांनी छत्रपती शिवाजी माहाराजांचे आदर्श व त्यांच्यातील गुण हे विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी प्रत्येक ऐतिहासिक भेटी दरम्यान त्या वस्तू व वास्तुंचे अमूल्य योगदान स्पष्ट केले.
हेही वाचा – मास्टरमाईंड शाळेतील शिक्षकांच्या कामगिरीची ‘इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद
अजिं क्यतारा भेटी दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी मंगळादेवी मंदिर परिसर स्वच्छ केला आणि सर्व विद्यार्थ्यांनी महाराजांच्या इतिहासाला आठवत “जय भवानी, जय शिवाजी” व अन्य घोषणांनी अजिंक्यतारा गडाचे वातावरून भारावून टाकले आलेल्या पर्यटकांमध्ये उत्साह निर्माण केला. या भेटी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय व तेथील विश्वस्थ मंडळींचे आभार प्रकट केले.
मराठा साम्राज्याच्या इतिहासाला उजाळा…
संगम माहुली भेटी दरम्यान स्वराज्याचे पाचवे छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी आणि महाराणी येसूबाई यांची समाधी या पवित्र स्थळांचे दर्शन विद्यार्थ्यानी घेतले. मराठा साम्राज्य अटकेपार पोहोचविणारे थोरले शाहू महाराजांची कारकीर्द सर्व सामान्यांपर्यंत अधिक ताकदीने पोहोचवावी आणि त्यांच्या इतिहासाला उजाळा द्यावा असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.