मास्टरमाईंड शाळेतील शिक्षकांच्या कामगिरीची ‘इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद
शिक्षण विश्व: 15 X 20 फुटाची रांगोळी साकारून शिवरायांना मानवंदना

पिंपरी-चिंचवड: माईंड ग्लोबल स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेज येथील शिक्षकांनी शिवजयंती निमित्त तब्बल 15 X 20 फुटाची रांगोळी साकारून शिवरायांना मानवंदना दिली. यासाठी दोन तास 19 मिनिटे वेळ लागला. महत्त्वाचे म्हणजे याची दखल इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये घेण्यात आली आहे.
माईंड ग्लोबल स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेज मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. प्रदिपा नायर त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सकाळी आठ वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता ७ वी आणि ८ वी चे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते.
हेही वाचा – लोणावळ्यात होणार ग्लास स्कायवॉक
विद्यार्थ्यांच्या रॅलीची सुरुवात शाळेपासून झाली .भोसरी मुख्य चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन , ढोल ताशा, लेझीम तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सादर केले
शिक्षकांच्या कामगिरीचे ‘ रेकॉर्ड’
शाळेच्या मुख्याध्यापिका प्रदीपा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ’ ऍक्टिव्हिटी-रांगोळी , साई मंदिर , वडमुख वाडी येथे काढण्यात आली. शिक्षकांनी दोन तास १९ मिनिटे अथक परिश्रम करून ‘१५X २०फूट’ भव्य रांगोळी साकारली. याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये घेण्यात आली आहे. माजी नगरसेवक सागर गवळी , इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अध्यक्ष फिरोझ खान उपस्थित होते.