भोसरीतील संत साई शाळेत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा
शिक्षण विश्व: विद्यार्थ्यांकडून शिवरायांच्या पराक्रमाचा उजाळा

पिंपरी- चिंचवड : भोसरीतील संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सांस्कृतिक, धार्मिक पद्धतीने मोठ्या जल्लोषात परंपरेनुसार साजरा करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर , संत साहित्याचे अभ्यासक हभप डॉ. सुभाष गेठे महाराज, नारायण सुर्वे अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यावेळी उपस्थित होते.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांनीढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवरायांची मूर्ती तसेच प्रतिमेचे स्वागत केले. त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले. शिवरायांचा पाळणा विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आला. यावेळी विविध पारंपारिक पोशाखत विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण अप्रतिम होते. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्याविषयी त्यांनी केलेल्या पराक्रमाच्या गाथा विद्यार्थ्यांनी अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाचा कोथळा, गड आला पण सिंह गेला अशा विविध कलाकृतीतून सादर केल्या. पोवाडे, गीत ,प्रात्यक्षिके सादरीकरण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर भाषणे सादर केली.
हेही वाचा – शैक्षणिक सहलीतून इतिहास जागवण्याचा प्रयत्न!
शिक्षिका नम्रता ओव्हाळ, विद्यार्थ्यांमध्ये पूर्वी जवळगी, आर्या गुरव, ओजस मांजरे ,निलेश काळे, अवनी हांडे यांनी भाषणे केली. तसेच विविध कलाकृती सादर करताना श्रावणी सागर, शरण्या लोंढे, सानिका सांगडे ,सुमन कुमार सिंग ,विराट जयस्वाल, दक्षा सोमवंशी ,अनन्या पोखरकर या विद्यार्थ्यांनी सादरीकरणांमध्ये प्रामुख्याने सहभाग नोंदविला. श्रेयस रसाळ या विद्यार्थ्यांनी शिवगर्जना सादर केली.
पालक शिक्षक संघांचे प्रतिनिधी अजित मेदनकर, अनिता गव्हाणे, झहेदा मोकाशी, कविवर्य नारायण सुर्वे अकादमीचें अध्यक्ष सुदामजी भोरे, शाळेच्या संचालिका सुनीता ढवळेश्वर , उपमुख्याध्यापिका रूपाली खोल्लम, संजय अनर्थे, मनोज वाबळे , अक्षय राणे , स्वाती मोघे , भारती ढवळेश्वरउपस्थित होते. शिवजन्मोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षिका मनीषा ढगे ,सुहासिनी बदोले यांनी प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन केले.