Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

मोहम्मद सिराजने रचला इतिहास! आयपीएलमध्ये ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच गोलंदाज

Mohammed Siraj | आयपीएल २०२६ च्या ४६ व्या सामन्यात रविवारी गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जवर ४ गडी राखून थरारक विजय मिळवला. या विजयात गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या धारदार गोलंदाजीने नवा इतिहास रचला आहे. एकाच षटकात दोन बळी घेत सिराजने गुजरात टायटन्ससाठी आतापर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करून दाखवला आहे.

सिराजचा ऐतिहासिक रेकॉर्ड अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मोहम्मद सिराजने सुरुवातीपासूनच पंजाबच्या फलंदाजांवर धाक निर्माण केला. त्याने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये २८ धावा देत पंजाबच्या धावसंख्येला लगाम घातला. या कामगिरीदरम्यान त्याने सामन्याच्या पहिल्याच षटकात पंजाबच्या दोन महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी धाडले. आयपीएलच्या पहिल्याच षटकात २ गडी बाद करणारा सिराज हा गुजरात टायटन्सचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा

“हार्दिकला कुणाचाच सपोर्ट नाही”; मुंबईच्या ड्रेसिंग रूमबद्दल माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा!

पंजाबची स्फोटक सलामी जोडी केली फस्त पंजाब किंग्जची सलामी जोडी या हंगामातील सर्वात घातक जोड्यांपैकी एक मानली जाते. मात्र, सिराजने पहिल्याच षटकात पंजाबला हादरवून सोडले. त्याने आधी सलामीवीर प्रियांश आर्यला निशांत संधूकरवी झेलबाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर कुपर कॉनोलीला बाद करत पंजाबच्या डावाला सुरुवातीलाच सुरुंग लावला. या धक्क्यातून सावरताना पंजाबला २० षटकात ९ बाद १६३ धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबकडून सूर्यांश शेडगेने सर्वाधिक ५७ धावांची झुंजार खेळी केली.

सुंदरचा शेवटच्या चेंडूवर षटकार आणि विजय १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून साई सुदर्शनने ५७ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. मात्र, सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. अखेर वॉशिंग्टन सुंदरने शेवटच्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारत गुजरात टायटन्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सुंदरने नाबाद ४० धावांची खेळी करत संघाला ४ गडी राखून विजय मिळवून दिला.

सिराजच्या या विक्रमी गोलंदाजीमुळे पंजाबचा संघ मोठ्या धावसंख्येपासून वंचित राहिला, ज्याचा फायदा अखेर गुजरातला विजय मिळवण्यासाठी झाला. सध्या क्रिकेट वर्तुळात सिराजच्या या ऐतिहासिक कामगिरीचे मोठे कौतुक होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button