Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेल्यांनी अपात्रतेची काळजी करावी’; शरद पवार गटातील नेत्याचं विधान

मुंबई : सर्वोच्य न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर एका आठवड्याच्या आत सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कामाला लागले आहेत. दरम्यान, यावरून शरद पवार गटातील नेते शशिकांत शिंदे यांनी शिंदे गटातील आमदारांवर खोचक टीका केली आहे. निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेल्यांनी अपात्रतेची काळजी करावी, असा टोला शशिकांत शिंदे यांनी लगावला आहे.

शशिकांत शिंदे म्हणाले, शरद पवारांच्या निष्ठेपायी अपात्र झालो, तरी पर्वा नाही. त्यांच्यामुळे राजकारणात आलो. त्यांच्यामुळे पद मिळालं. त्यांच्यासाठी कुठलाही त्याग करण्याची तयारी आहे. निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेल्यांनी अपात्रतेची काळजी करावी. आम्ही अपात्र होणार म्हणून स्वप्न बघणारे अपात्र होतील.

हेही वाचा – सांगली : शिव स्वराज्य गणेश मंडळातर्फे ‘‘हळदी-कुंकू’’ समारंभ उत्साहात

न्यायालय त्यांना १०० टक्के अपात्र ठरवेल. पण असं झालं नाही, तर जनतेच्या दरबारात ते अपात्र ठरतील. हे मी जाहीररित्या सांगतो, त्यांनी माझ्या अपात्रतेची काळजी करू नये. आम्ही निष्ठावान आहोत. त्याग करण्याची आमची तयारी आहे. पक्ष निष्ठा बाजूला ठेवली. निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने निवडून दिलं. त्या जनतेशी गद्दारी करून खोक्यांसाठी तिथे गेलात. येणाऱ्या निवडणुकी महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने उतरेल व तुम्हाला पराभूत करेल, असंही शशिकांत शिंदे म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button