Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांत २७ वाहनांची तोडफोड

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. शहरातील विविध भागांत एकूण २७ चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल आहे. सांगवी आणि निगडित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी अद्यापही मोकाट आहेत.

पिंपरी- चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र थांबलेलं नाही. शहरातील आकुर्डी, निगडी आणि सांगवी परिसरामध्ये एकूण २७ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. आकुर्डी गुरुद्वारा येथे १५, निगडीमध्ये पाच आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

हेही वाचा   –      ‘एका मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली’; जयंत पाटलांचं येवल्यात मोठं विधान 

ही घटना मध्यरात्री घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. हातात दांडके घेऊन चारचाकी वाहनांची तोडफोड करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

या आधी देखील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. आरोपींना अटक करून त्यांची धिंड देखील काढण्यात आली होती. आता पुन्हा एकदा सांगवी, निगडी आणि चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. पैकी, चिंचवड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल आहे. इतर आरोपींचा शोध सांगवी आणि निगडी पोलीस घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button