Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पतीच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग

पिंपरी – पतीने दीड लाख रुपये घेऊन बाहेर बोलावले आहे, असे सांगून महिलेला एका लॉजवर नेऊन तिचा विनयभंग केला. तसेच तिने आणलेले दीड लाख रुपये घेऊन पळून गेला. हा प्रकार १७ ते २५ जानेवारी २०१९ या कालावधीत दिघी येथे घडला. याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गोकुळ गिरी (रा. नांदेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी, पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ हा पीडित महिलेच्या पत्नीचा मित्र आहे. त्याने १७ जानेवारी रोजी महिलेला फोन करून सांगितले की, तिच्या पतीने दीड लाख रुपये घेऊन दिघी येथील मॅगझीन चौकात बोलावले आहे. त्यानुसार पीडीत महिला घरातील दीड लाख रुपये घेऊन मॅगझीन चौकात गेली.

आरोपीने तिला तिथल्या एका लॉजवर नेले. तिथे तिच्याशी अश्लील वर्तन करुन विनयभंग केले. तसेच महिलेने आणलेले दीड लाख रुपये जबरदस्तीने घेऊन पळून गेला. याबाबत भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button