Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन; न्यायालयाकडून कडक अटी

पुणे | वारकरी संप्रदाय आणि संतांविषयी समाजमाध्यमांवर (Social Media) अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बागल यांनी काही कडक अटी व शर्ती घालत लवांडे यांचा जामीन अर्ज मंजूर केला.

या गुन्ह्याचा तपास आता अंतिम टप्प्यात आला असून, या गुन्ह्यात तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसून, यातून काही साध्य होणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने जामीन मंजूर करताना नोंदवले.

गुन्ह्याचे स्वरूप आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता विचारात घेऊन न्यायालयाने लवांडे यांना जामीन देताना महत्त्वाच्या शर्ती घातल्या आहेत. आरोपीने भविष्यात पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये, पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करू नये आणि आपल्या कायमस्वरूपी वास्तव्याचा पत्ता न्यायालयात सादर करावा, या अटींवर हा जामीन देण्यात आला आहे. आरोपीने या सर्व अटींचे पालन करण्याची तयारी दर्शवली आहे. लवांडे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील ॲड. मिलिंद पवार यांनी जामिनासाठी न्यायालयात युक्तिवाद केला होता. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा निर्णय दिला. या कामात त्यांना ॲड. सुयोग गायकवाड, ॲड. हर्षवर्धन पवार आणि ॲड. सारंग बहिरट यांनी सहाय्य केले.

हेही वाचा

RCBची फायनलमध्ये धडक! पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा ९२ धावांनी दणदणीत पराभव

नेमके प्रकरण काय होते?

विकास लवांडे यांची एक चित्रफीत (Video) २९ एप्रिल रोजी सोशल मीडियावर प्रसारित झाली होती. या व्हिडिओमध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी एका महिलेने पुण्यातील वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यानंतर पुण्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयाने लवांडे यांना दिलेले अंतरिम अटकपूर्व जामीन संरक्षण काढून घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुरुवारी (२१ मे) लवांडे यांना अटक केली होती. अटकेनंतर न्यायालयाने त्यांची रवानगी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले होते, जिथून आता त्यांना जामीन मिळाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button