ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे बिगूल वाजले; आम आदमी पार्टीच्या वतीने आकुर्डीमध्ये सभा संपन्न

पिंपरी |आम आदमी पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक २१ आकुर्डी येथे विश्वरत्न  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बंटीग्रुप बिल्डिंग समोर आकुर्डी या प्रभागातील इच्छुक उमेदवार वैजनाथ शिरसाट यांच्या प्रचारार्थ कोपरा सभा पार पडली.

यावेळी बोलताना वैजनाथ शिरसाट यांनी प्रभागातील अनेक समस्यांची पोलखोल केली, त्यांनी सांगितले आम आदमी पार्टीची पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता आल्यास महापालिकेत उच्चदर्जाच्या शाळा, २४ तास  मोफत पाणी देण्यात येईल, महिलांसाठी बस फ्री करण्यात येईल, शास्तिकराचा विषय कायमचा मार्गी लावण्यात येईल असे त्यांनी म्हटले.

महागाईने जनता मेटाकुटीला आलेली आहे येणाऱ्या काळात ही जनता भाजपला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी म्हटले, वैजनाथ शिरसाट गेली पंधरा वर्षे त्या प्रभागांमध्ये सामाजिक कार्य करत आहेत. त्यांना स्थानिकांसह ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा या भागांमधून आहे ते ओबीसी संघर्ष सेना पिंपरी-चिंचवड संघटनेचे अध्यक्ष आहेत.

या वेळी आपचे प्रवक्ते प्रकाश हगवणे बोलतांना म्हटले एकेकाळी श्रीमंतीचा रुबाब असणारी महापालिका सत्ताधार्यांच्या कोट्यावधीच्या घोटाळ्यामुळे भिकेचे डोहाळे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्ताधारी आणि विरोधक आणि प्रशासक या महापालिकेमध्ये यांचे लागेबांधे आहेत. अंदर की एक बात है हम सब एक है अशाप्रकारे विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांच्या हातात हात घालून फिरत असतात. अनेक कामाच्या निविदा वाजवी दरात करून त्यामधून टक्केवारीचे गणित सांभाळणे हा उद्योग ह्या महापालिकेमध्ये सर्रास चालू आहे. अनेक कंत्राटदार महानगरपालिकेच्या कामामुळे गर्भ श्रीमंत झाले आहेत. आपची महापालिकेत सत्ता आली तर हा भ्रष्टाचार मोडीत काढला जाईल.

यावेळी शहर आप उपाध्यक्ष महेश बिराजदार, कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, स्वप्नील जवळे, यल्लाप्पा वालदोर, गोविंद माळी, चंद्रमणी जावळे, सरोज कदम, आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शब्दात भाजप सरकारचे वाभाडे काढले.

यावेळी आम आदमी पार्टी पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष वहाब शेख,आप नेते कपिल मोरे, आप पिंपरी-चिंचवड डॉक्टर विंग अध्यक्ष अमर डोंगरे, चांद मुलानी, सतीश नायर, ब्रह्मानंद जाधव, अजय सिंग, शशिकांत कांबळे, सरफराज मुल्ला, देवेंद्र यादव, कुणाल वक्ते आजिनाथ सकटनाय, संतोषी नायर, जावळे मामी, अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सीमा यादव यांनी आभार व्यक्त केले.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button