breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,43,837 वर

  • मुंबईत 1,329, पुण्यात 1,341 नवे रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. मंगळवारी आढळलेल्या 8 हजार 522 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 15 लाख 43 हजार 837 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 187 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 40 हजार 701 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 15 हजार 356 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात आतापर्यंत एकूण 12 लाख 97 हजार 252 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 2 लाख 05 हजार 415 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत मंगळवारी कोरोनाचे 1 हजार 329 नवे रुग्ण आढळले, तर 38 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 32 हजार 395 वर पोहोचली आहे. तसेच दिवसभरात 1 हजार 329 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईतील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 98 हजार 127 इतकी झाली आहे.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात 1 हजार 341 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 46 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 09 हजार 193 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 7 हजार 250 इतका झाला आहे. तसेच दिवसभरात 998 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. दरम्यान, सोमवारी आढळलेल्या 1 हजार 341 नव्या रुग्णांपैकी 486 रुग्ण पुणे शहरातील असून 244 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 1 लाख 55 हजार 067 वर पोहोचली आहे, तर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या 84 हजार 275 इतकी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button