breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

कोरोनाविरोधातील लढाईसाठी अक्षय कुमारचा मदतीचा हात ,25 कोटींची केली आर्थिक मदत

कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. त्याचप्रमाणे अनेक संस्थानंकडून,व्यापारांकडून,त्याचप्रमाणे अनेकजण त्यांच्या परिने आर्थिक मदत केली जात आहे… अशामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षय कुमारने २५ कोटींची आर्थिक मदत करणार असल्याचं सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगाने वाढणाऱ्या कोरोनाशी लढण्यासाठी देशातील जनतेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. मोदींनी ट्विट करत देशातील जनतेने पीएम-केअर्स फंडात आर्थिक योगदान द्यावे, असे आवाहन केले.

मोदींच्या या आवाहनानंतर अक्षय कुमारने पीएम-केअर्स फंडाला २५ कोटींची आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button