TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

केवळ पत्नीचा नियम करतो फॉलो… सूर्यकुमारने केला गेम प्लॅनचा खुलासा

 टीम इंडियाचा सध्याचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आजकाल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. वर्ल्डकपमध्ये असलेला त्याचा हा फॉर्म टीमसाठी देखील खूप महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये सूर्याने विरोधी टीमच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केलीये. या स्पर्धेत सूर्याने आतापर्यंत तीन अर्धशतकं झळकावलीयेत. सध्याच्या क्रिकेटमध्ये 360 खेळाडू असं म्हटलं जाणारा सूर्या टी-20 क्रमवारीत नंबर 1 फलंदाज बनलाय.

सध्या उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या सुर्याचा गेम प्लॅन नेमका कसा आहे हे चाहत्यांना जाणून घेण्याची फार उत्सुकता आहे. तर सूर्यकुमार सामन्यापूर्वी दोन महत्त्वाच्या नियमांचे पालन करतो. यामध्ये एक नियम त्याचा स्वतःचा असतो आणि दुसरा नियम त्याची पत्नीचा पाळतो.

काय आहे सूर्याच्या पत्नीचा नियम?

एका इंग्रजी वेबसाईटच्या म्हणण्यानुसार, सूर्यकुमारची पत्नी देविशा प्रत्येक दौऱ्यावर सूर्यासोबत असते. ती प्रत्येक सामन्यापूर्वी सूर्याना नियम देते. त्यानुसार ती सूर्याचा फोन मॅचच्यापूर्वी सोबत ठेवते. यामुळे सूर्यावर अतिरिक्त दबाव नाही. सूर्या त्याच्या गेम प्लॅन अंतर्गत वेगळ्याच मानसिक झोनमध्ये जातो. ज्यामुळे आणि अशा खेळी सतत खेळण्यास सक्षम आहे.

4 वर्षांपासून सूर्या करतोय प्लान फॉलो

नुकंतच एका पत्रकाराने सूर्यकुमारला प्रश्न केला होता की, सामन्यापूर्वी तो कोणता गेम प्लॅन फॉलो करतो. यावेळी उत्तर देताना सूर्या म्हणाला, गेली 4 वर्षे मी हीच रणनीती फॉलो केली आहे. मुख्य म्हणजे मला खूप फायदाही झालाय. मी सामन्याच्या अगदी आधी एक दिवस सुट्टी घेतो. यावेळी मी जितका सराव करायचा आहे तितका करतो.

सूर्याचा नवा विक्रम

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादवने   झिम्बाब्वे विरुद्ध 35 धावा करून इतिहास रचला आहे. या धावांसह T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 धावा करणारा सूर्यकुमार भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी एका वर्षात भारतासाठी असा पराक्रम इतर कोणत्याही फलंदाजाने केला नव्हता.

सूर्यकुमार यादव याने झिम्बाब्वे विरुद्ध संघाच्या शेवटच्या गट सामन्यात 35 धावा पूर्ण केल्यामुळे क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये इतिहास रचला.सूर्यकुमार यादव आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 धावा करणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button