breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राष्ट्रवादीची अतिरिक्त मतं संजय पवारांना द्या, शरद पवारांच्या स्पष्ट सूचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक मुंबईत पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकची मतं राज्यसभा निवडणुकीसाठी उर्वरित ११ मतं शिवसेनेच्या संजय पवार यांना द्या, काँग्रेस आणि शिवसेनेसोबत १४ महापालिका निवडणुकीतील आघाडी सदर्भात चर्चा करावी, अशा सूचना राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्या आहेत. शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांशी चर्चा करुन आघाडीसंदर्भात समस्या असल्यास समजून घ्या, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत.

राज्यातील १४ महापालिका निवडणुकांसंदर्भात आघाडी करण्यासाठी चर्चा करा. काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चा करा. मुंबई महापालिकेसाठी विभागवार बैठका घ्या. मंत्र्यांनी महापालिका निवडणुका असलेल्या ठिकाणी जनता दरबार घ्यावेत, अशा सूचना देखील शरद पवार यांनी दिल्या आहेत.

  • राष्ट्रवादीची अतिरिक्त मतं शिवसेनेलाच

राष्ट्रवादीची अधिकची मतं ही शिवसेनेलाच देणार असल्याचं अजित पवार यांनी सकाळी सांगितलं होतं. शरद पवारांनी शिवसेना नेत्यांना सांगितलं होतं की पूर्ण शिवसेनेचा उमेदवार निवडूण येण्याची मतं शिवसेनेकडेही नाही राष्ट्रवादीकडेही नाही, त्यामुळे यावेळी तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या आणि पुढच्यावेळी आम्ही तुम्हाला देतो, तशा पद्धतीने आमची जी अधिकची मतं आहेत ती आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला देणार आहोत, असं अजित पवार म्हणाले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शरद पवार आणि फौजिया खान हे बिनविरोध विजयी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी राज्यात फिरावं अशा सूचना शरद पवार यांनी दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. बिहारमध्ये सर्व पक्षांनी एकत्र येऊन जातनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. नितीशकुमार यांनी त्यामध्ये आघाडी घेतली. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यासंदर्भात पुढाकार घ्यावी, अशी चर्चा झाली, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम ३४० मध्ये इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्यात यावं, असं म्हटलं होतं. आरक्षणासंदर्भातील आलेल्या अडचणींमुळं जातनिहाय जनगणना करणं आवश्यक असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवरील नेते चर्चा करतील, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button