TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

विराट कोहली बाबत Big news!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ने आज ऑक्टोबर 2022 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. यामध्ये ‘किंग’ कोहली ICC ‘प्लेयर ऑफ द मंथ ठरला आहे. 

विराट कोहली जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंमध्ये त्याची गणना होते. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याने 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर विराट कोहलीनं मागे वळून पाहिलं नाही. आजच्या घडीला तो टीम इंडियाचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे. त्याने 102 कसोटी, 262 वनडे आणि 113 टी 20० सामन्यांत देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 

तसेच विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 8,074 धावा आहेत. त्यात 27  शतके आणि 28 अर्धशतके आहेत. वनडेमध्ये त्याने 43 शतके आणि 64 अर्धशतके ठोकली आहेत.

त्याच्या नावावर 12,344 धावा आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 3932 धावा आहेत. यात त्याचा 1 शतक आणि 36 अर्धशतके आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button