TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘‘एक व्यक्ती, एक पद’’ फॉर्म्युलामुळे काँग्रेसच्या शहराध्यक्षांचे पद धोक्यात?

पिंपरी : एकीकडे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एक व्यक्ती, एक पद’ हा फॉर्म्युला अस्तित्वात आला आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहर पातळीवर यामुळे धोक्याची घंटा वाजू लागली आहे. विद्यमान शहराध्यक्ष कैलास कदम यांच्याकडे चार पदे असून हा फॉर्म्युला शहरातही लावण्याच्या हालचालींना वेग आला आहे. एक व्यक्ती, एक पद’ असावी अशी तक्रार थेट वरिष्टांकडे करण्यात आली आहे. यामुळे कैलास कदम याच्याकडील शहर काँग्रेस अध्यक्ष बदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे.
पक्षांतर्गत गटबाजीने कॉंग्रेसला आतून पोखरले असताना पुन्हा शहराध्यक्ष पदांसाठी इच्छुकांमध्ये चढाओढ लागली आहे. पक्षाची स्थानिक पातळीवर वाताहत सुरू असताना वरिष्ठ स्तरावरून पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये वाद लावून देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. राज्य पातळीवर ‘एक व्यक्ती एक पद’ पॉलिसी आणली जाते तर दुसरीकडे शहरात एकाच व्यक्तीकडे चार-चार पदाचा कार्यभार दिला जातो. याविरोधात पक्षातील कार्यकर्त्यांनी यामुळे काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांचे पद जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तत्कालीन अध्यक्ष सचिन साठे यांच्यानंतर काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदावरून निर्माण झालेल्या वादात पक्ष रसातळाला गेला होता. वाद घालण्या-यांनी पक्षवाढीचा विचार न करता स्वतःला अधिकार कसे मिळतील, यासाठीच वेळ खर्ची घातला. त्यांच्या स्वार्थी राजकारणामुळे पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकत्यांची घड़ी विस्कटली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी कामगार नेते तथा माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या वरती देण्यात आली.
आता कदम यांच्या शहराध्यक्ष पदावरून नवा वाद निर्माण झाला आहे. एक व्यक्ती एक पद या पॉलिसीनुसार एका व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक पदाचे अधिकार देण्यास प्रतिबंध घातले आहेत. तरीही कदम यांच्याकडे चार विविध पदांचे अधिकार देण्यात आले. आहेत. त्यांच्याकडे अखिल भारतीय इंटक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव पदासह महाराष्ट्र प्रदेश इंटक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदांचे देखील अधिकार आहेत. शिवाय काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पद देखील त्यांच्याकडे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button