breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पनवेलमध्ये धक्कादायक प्रकार : संचारबंदी असतानाही भाजपा नगरसेवकाचे वाढदिवस सेलिब्रेशन

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला असतानाही पनवेलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका भाजप नगरसेवकाने लॉकडाऊन असतानाही मित्रांसोबत वाढदिवस साजरा केल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू आहे. लोक सोशल डिस्टिंसिंग पाळत आहेत आणि इकडे नगरसेवकाने नियम धाब्यावर बसवल्याने आदर्श नागरिक कोण असा प्रश्न उपस्थित राहतो.

भाजप नगरसेवक अजय बेहरा यांनी त्यांच्या 10 मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. 10 मित्रांसोबत बर्थडे पार्टी करताना त्यांनी पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती आहे. पनवेल पोलिसांनी केली 11 जणांवर कारवाई केली असल्याचं सांगण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात पार्टी करताना अटक करणारी राज्यातील पहिलीच घटना आहे.

घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टिंसिंगचा वापर करा अशा अनेक सूचना माध्यमांमधून, प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून देण्यात येत आहेत. पण त्याच नियमांचं उल्लंघन करत जर नगरसेवकानेच असं कृत्य केलं तर नागरिक कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणार असा प्रश्नच आहे. त्यामुळे नगरसेवक अजय बेहराचा नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button