पिंपरी / चिंचवड

काळेवाडी येथे घरफोडी करून एक लाख 13 हजारांचा ऐवज पळवला

पिंपरी l प्रतिनिधी

विजयनगर काळेवाडी येथे चार अनोळखी चोरट्यांनी घरफोडी करून एक लाख 13 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना 4 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली. घरमालक गावी गेले असल्याने गावाहून आल्यानंतर त्यांनी याबाबत बुधवारी (दि. 16) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मनमोहन श्यामसुंदर बुलाणी (वय 52, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या फ्लॅटला कुलूप लावून गावी गेले होते. 4 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सव्वादोन ते तीन वाजताच्या कालावधीत चार अनोळखी चोरट्यांनी फ्लॅटच्या दरवाजाचे लॅच लॉक उचकटून आत प्रवेश केला. बेडरूम मधील लोखंडी कपटाचा दरवाजा उचकटून सोन्या-चांदीचे दागिने, कॅमेरा, रोख रक्कम असा एकूण एक लाख 13 हजारांचा ऐवज चोरून नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी ठाकूर तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button