पिंपरी / चिंचवड

भोसरीत तरुणाचा निर्घृण खून

पिंपरी l प्रतिनिधी

भोसरी परीसरातील गुळवेवस्ती येथे तरुणावर शस्त्राने वार करून त्यानंतर दगडाने चेहरा ठेचून विद्रुप करत निर्घृणपणे खून केला. ही घटना सोमवारी (दि. 17) रात्री उशिरा गुळवेवस्ती, भोसरी येथे उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा गुळवेवस्ती येथे एक तरुण जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. एका तरुणाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच त्याची ओळख पटू नये यासाठी दगडाने चेहरा ठेचून विद्रुप केल्याचे समोर आले. त्यामुळे खून झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button