breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

भाजप नेत्यांचे आकडे तंतोतंत खरे ! निवडणुकीचा ‘एक्झिट पोल’ सांगतोय पुन्हा महायुतीचेच सरकार

पुणे/पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्यभरात राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनुकूल वातावरण दिसत असलं तरी आज जाहीर केलेल्या एक्झिट पोलचा अंदाज मात्र, भाजप-शिवसेना महायुतीला दोनशेहून अधिक जागा मिळणार असल्याचे वर्तवित आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा बहुमताने भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. हा अंदाज भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केलेल्या आकड्यांशी तंतोतंत जुळत आहे.

या एक्झीट पोलनुसार महाआघाडीला केवळ 60 ते 70 जागांवर समाधान मानावे लागेल असे दिसते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांनीही 230 पर्यंत युतीचा आकडा नेऊन ठेवला होता. भाजप स्वबळावरही सत्तेवर येऊ शकते, असेही हे आकडे सांगत आहेत.

आज मतदान संपल्यानंतर विविध वृत्त वाहिन्यांनी जाहिर केलेल्या एक्झिट पोलचे आकडे बरोबर सायंकाळी साडेसहाला जाहीर झाले. दुपारी तीन वाजेपर्यंतच्या माहितीवर अधारित हे आकडे जाहीर करत असल्याचे वृत्त वाहिन्यांनी म्हटले आहे.

Exit poll in Maharashtra:

Times Now:

BJP+: 230

Cong+: 48

Others: 10

India Today: 

BJP+: 166-194

Cong+: 72-90

Others: 22-34

CNN News 18: 

BJP+: 243

Cong+: 41

Others: 4

Republic:

BJP+: 223

Cong+: 54

Others: 11

ABP News

BJP+: 204

Cong+: 69

Others: 15

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button