breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पवारसाहेब, जो उमेदवार देतील, त्यांना निवडून आणायचे – अजित पवारांनी इच्छुकांना दिले आदेश

उद्या पिंपरीत धडाडणार तोफा, माजी आमदार विलास लांडे यांच्या अनुउपस्थितीमुळे चर्चेला उधान

पिंपरी | महाईन्यूज |प्रतिनिधी|

विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून आचारसंहिताही लागू झाली आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांची अजित पवार यांनी पुण्यात बैठक घेतली. तसेच आपल्याकडे इच्छुकांची संख्या अधिक असली तरीही आपल्यापैकींच एकाला पक्षाकडून उमेदवारी मिळेल. उमेदवारीबाबत जो काही निर्णय असेल, तो पवारसाहेबच घेणार आहेत. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळेल, त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकजूटीने काम करावे, असे आदेश अजित पवार यांनी सर्वांना दिले. दरम्यान, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी दांडी मारल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

पुण्यात झालेल्या बैठकीस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी आमदार अण्णा बनसोडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, राजेंद्र जगताप, पंडीत गवळी, पक्षाचे प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार यांनी प्रत्येक इच्छुकांकडून निवडणुकीबाबत मते जाणून घेतली. तसेच उमेदवारांचे नियोजन जाणून घेतले. सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत सर्वांनी विश्वासाने काम करावे, गट-तट बाजूला ठेवून काम करावे, यावेळी पिंपरी, चिंचवड व भोसरी या तिन्ही विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवाव्यात, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीलाही लांडे यांनी गैरहजेरी लावली होती. त्याबाबतही अजित पवार यांनी या बैठकीत चिंता व्यक्त केल्याचे समजते.

दरम्यान, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा निवडणुकीबाबत अजित पवार उद्या दुपारी चार वाजता काळेवाडी येथील बालाजी मंगल कार्यालयात सायंकाळी 5 वाजता कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. त्यात प्रचाराचा श्री गणेशा करणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button