ताज्या घडामोडीपुणे

दीड वर्षाच्या मुलाची काही तासांत सुटका; पुणे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

पुणे | पुण्यातील सहकारनगर परिसरात एका दीड वर्षांच्या बाळाला पळवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी काही तासांत बेड्या ठोकल्या. सहकार नगर पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला शिताफीने अटक केली आणि बाळाची सुखरूप सुटका केली. सुनील पांढरे असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राणी गुळमकर यांनी याबाबत तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१ मे रोजी राणी अमोल गुळुमकर (वय २७ वर्षे, धंदा. गृहीणी, रा. श्रीरामनगर, पेन्सील चौक, भिगवण रोड, बारामती, जि. पुणे) आणि मुळगांव (माळेवाडी जांभुळ, पो.अकलुज, ता. माळशिरस, जि.सोलापूर) या मुलगा कार्तीक (वय दीड वर्ष) याला घेवून मित्र सुनील सोपान पांढरे (वय २६ वर्षे, धंदा ड्रायव्हर रा.मु. पो. पांढरेवाडी, ता.गंगाखेड, जि.परभणी) याच्यासोबत बारामतीहून पुण्यामध्ये फिरण्यासाठी आल्या होत्या. ते सर्वजण बालाजी नगर येथील एका लॉजमध्ये थांबले होते. तिथून ते दगडुशेठ गणपती, कात्रज सर्पोद्यान, स्वामी नारायण मंदीर येथे फिरुन पुन्हा पुन्हा लॉजवर आले. ३ मे रोजी सुनील पांढरे याने राणी गुळमकर यांना मारहाण करुन रुममध्ये कोंडले. आणि त्यांच्या दीड वर्षांच्या मुलाला घेऊन आरोपी पळवून घेऊन गेला, अशी माहिती सहकार नगर पोलिसांनी दिली.

याबाबत संबंधित महिलेने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर सहकारनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि सूत्रांच्या माहितीच्या आधारे लहान मुलाला पळवून नेणारा आरोपी सुनील पांढरे हा अहमदपूर, लातूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक छबु बेरड व तपास पथकातील अंमलदार भुजंग इंगळे व महेश मंडलीक हे लातूरच्या अहमदपूर येथे रवाना झाले. त्यांनी घटनास्थळवरून सुनील सोपान पांढरे यांच्यासह बाळाला ताब्यात घेतले आणि सहकारनगर पोलीस स्टेशन येथे हजर झाले. बाळाला सुखरूपणे त्याच्या आईच्या कुशीत दिले. आरोपी सुनील पांढरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button