breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

दिवाळीआधी जनतेला मोदी सरकारचं मोठं गिफ्ट; आता ६०० रूपयांमध्ये मिळणार LPG सिलिंडर

LPG Cylinder : केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान २०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढवले ​​आहे. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने एलपीजीच्या दरात २०० रुपयांची कपात करण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली होती.

आता उज्ज्वला लाभार्थीची सबसिडीची रक्कम २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता ६०० रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

हेही वाचा – पुण्यात गणेशोत्सवात डीडेच्या लेझर लाईटमुळं तरूणाला अंधत्व

सिलिंडरची किंमत ११०० रुपयांवरून ९०० रुपयांपर्यंत कमी झाली होती. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ७०० रुपयांना सिलिंडर मिळत होता. आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या ३०० रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे सिलिंडर अवघा ६०० रुपयांना मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button