breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंकडे फक्त चार पर्याय; पहा काय घडू शकते…

मुंबई: शिवसेनेचे निष्ठावंत, पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते, राज्य सरकारमध्ये नगर विकासासह अनेक महत्त्वाच्या खात्याचे मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात मोठी राजकीय हलचाल सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या बंडला निमित्त ठरले ते १२ तासांपूर्वी जाहीर झालेल्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल होय. ज्या निवडणुकीत भाजपचे चार उमेदवार विजय होणार होते तेथे पाच उमेदवार विजय झाले. काही दिवसांपूर्वी राज्यसभा निवडणुकीत देखील शिवसेना आणि महाविकास आघाडीला असाच धक्का बसला होता.

एकनाथ शिंदे यांच्या सोबत २२ आमदार असल्याची चर्चा आहे. विधानसभेत शिवसेनेचे ५५ आमदार आहेत त्यापैकी २२ शिंदेंसोबत असतील तर शिवसेनेकडे फक्त ३३ आमदार शिल्लक राहतील. शिंदेंची नाराजी नेमकी कशामुळे आहे हे अद्याप समोर आले नसले तरी जी चर्चा सुरू आहे त्यावरून सध्याच्या बंडातून राज्यातील राजकारणात चार गोष्टी होण्याची शक्यता अधिक आहे. जाणून घेऊयात काय होऊ शकते.

शक्यता क्रमांक- १

राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्यावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. त्याच्या सोबतच्या नाराज आमदारांचे देखील हेच मत असल्याने ते शिवसेनेकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडण्याची अट घालू शकतात. त्याच बरोबर भाजप सोबत सरकार स्थापन करून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री तर स्वत:ला उपमुख्यमंत्री करण्याची अट ते ठेवू शकतात. शिवसेनेकडून ही मागणी मान्य झाली तर राज्यात पुन्हा एकदा युती सरकार येऊ शकते.

शक्यता क्रमांक- २

शिंदे यांची नाराजी दुर झालीच नाही आणि त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असेल तर नाराज आमदारांसोबत ते राजीनामा देतील. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येईल आणि ठाकरे सरकार पडले. त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंसह समर्थक आमदार भाजपच्या पाठिंब्यावर किंवा मदतीने निवडणूक लढवतील.

शक्यता क्रमांक- ३

एकनाथ शिंदे यांच्या समोर आणखी एक पर्याय म्हणजे शिवसेना आणि काही अपक्ष आमदारांना एकत्र करून विधानसभेत स्वतंत्र गट तयार करणे. यामुळे शिंदेंसह अन्य आमदारांना राजीनामा देण्याची गरज राहणार नाही. इतक नाही तर पोटनिवडणुकीला किंवा निवडणुकीला सामोरे जाण्याची गरज लागणार नाही. या परिस्थितीत शिंदे भाजपला पाठिंबा देऊन नव्या सरकारमध्ये महत्त्वाची खाती पदरात पाडून घेऊ शकतात.

शक्यता क्रमांक- ४

शिंदेंची नाराजी नेमकी काय आहे आणि ती शिवसेनेकडून दूर झाली तर राज्यातील महाविकास आघाडीवर आलेले हे संकट दूर होऊ शकते. शिंदेंना शिवसेनेत आणि राज्य सरकारमध्ये पुरेसे महत्त्व दिले जात नाही अशी चर्चा आहे. त्यांचा योग्य मान सन्मान ठेवला जाईल असे आश्वासन ठाकरे कुटुंबियांकडून मिळले तर शिंदेचे हे बंड शांत होऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button