breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

आता अनिल परब निशाण्यावर! ईडीने धाडली नोटीस

मुंबई – राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होऊ शकते. याबाबतची माहिती ट्विट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी यावरुन भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. त्यांनी म्हटलंय, शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. Chronology कृपया समज लिजीये. पुढे त्यांनी म्हटलंय की, कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गेल्या मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. काही वेळातच त्यांची जामिनावर सुटकाही झाली. पण नारायण राणे यांच्या अटकेमध्ये राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे राणे यांच्या अटकेमागे अनिल परब असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, भाजपाने चहूबाजुंनी अनिल परब यांची कोंडी करण्याचे प्रयत्न चालवले आहेत, असं बोललं जातंय. याआधी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या अटकेमागे अनिल परब असल्याचा भाजपचा आरोप आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने राजकीय कुरघोडी करण्यासाठी ही नोटीस पाठवली असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button