आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ई-वेस्ट संकलनाला पुन्हा सुरुवात; रविवारी 200 किलो ई-वेस्टचे संकलन

पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम ( PCCF), कै‌. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन पोलिस व नागरिक मित्र संघटना (KTTF) आणि जनवानी या स्वयंसेवी संस्थांनी ई-कचरा गोळा करण्यासाठी आणि त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे.कोरोना काळात ठप्प झालेले ई वेस्ट संकलन पुन्हा सुरु झाले आहे. रविवारी (दि. 29) अ प्रभाग कार्यालया बाहेर, भेळ चौक, निगडी प्राधिकरण येथे सकाळी साडेनऊ ते एक वाजताच्या कालावधीत सुमारे 200 किलो ई वेस्ट जमा करण्यात आले.

नगरसेवक अमित गावडे यांच्या हस्ते आणि अमित गोरखे यांच्या उपस्थितीत ई-वेस्ट संकलन उपक्रमाचा नव्याने शुभारंभ करण्यात आला आहे. पीसीसीएफ, केटीटीएफ आणि जनवानी संस्थांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी ई-कचरा स्वीकारणारी केंद्र उभारली जाणार आहेत. याठिकाणी घरातील अनावश्यक ई-कचरा नागरिकांना जमा करता येईल.गोळा झालेल्या ई-कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट केली जाणार आहे तसेच, त्यातील उपयोगात येणाऱ्या वस्तू गरजूंना दान केली जातील. ज्या वस्तूंचा किरकोळ दुरुस्ती करुन वापर केला जाऊ शकतो अशा वस्तू गरजवंताना दान केल्या जाणार असल्याचे या संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

जुने, निरोपयोगी मोबाईल फोन, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, प्रिंटर, माऊस, मोबाईल, लॅपटॉपच्या बॅटरीज्, लॅन्ड लाईन फोन, रेडिओ, टिव्ही, कॅल्क्युलेटर, जुना कॅमेरा, वायर्स, पिन, केबल्स, पेनड्राईव, आयपॉड, वॉकमन, हेडफोन्स, सेल यासारख्या वस्तू तुम्ही केंद्रावर जमा करु शकता. या वस्तू महाराष्ट्र प्रदूषण मंडळ मान्यता प्राप्त संस्थेला देण्यात येतात, ती संस्था शास्त्रीय पद्धतीने या वस्तूंची विल्हेवाट लावते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button