breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘बीआरटीएस’ प्रकल्प म्हणजे “आंधळं दळतंय अ्न कुत्र पिठ खातंय”

राष्ट्रवादी कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांचा मनपा प्रशासनावर आरोप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केलेला बीआरटीस मार्ग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेला नाही. त्याकडे महापालिका प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. शहरातील वाहन संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काही लाखांच्या घरात वाहने पोहोचली आहेत. त्या तुलनेत रस्ते, पार्किंगची समस्या तीव्र बनत चालली आहे.

खासगी वाहने कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. म्हणून ‘बीआरटी’चा निर्णय घेत प्रवाशांना सुखकर प्रवासाची हमी देण्यात आली. ‘बीआरटी’चे काही मार्ग पूर्ण झाले मात्र, प्रथम सुरू केलेल्या मार्गांचीही दयनीय अवस्था आहे. यावर किती खर्च झाला, हेही एकदा जाहीर होणे गरजेचे आहे. मार्ग केले असले तरी त्यावर अतिक्रमण वाढले. मग त्या मार्गांवर ‘लंगडी-लंगडी’ खेळायची का, असा सवाल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी बीआरटीएस विभागाचे कार्यकारी अभियंता यांना विचारला आहे. महापालिकेचे कनिष्ठ अभियंता रविंद्र सूर्यवंशी यांना कस्पटे यांनी काळेवाडीतील डांगे चौक येथील प्रत्यक्ष बीआरटीएस मार्गांची पाहणी करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांना कस्पटे यांनी बीआरटी मार्गवरील मार्गदर्शक फलक, अतिक्रमणाचा विळखा, सुरक्षा रक्षक, वाहनतळाबाबत आदि विषयांवर विविध प्रश्नांची सरबत्ती करून अनुत्तरीत केले. येत्या आठ दिवसात बीआरटीएस मार्गावर सुविधा न पुरविल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी कस्पटे यांनी सूर्यवंशी यांना निवेदन दिले.

यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना विनाअडथळा जलद प्रवास करता यावा, प्रदूषण मुक्तीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी ‘बस रॅपिड टान्झीट सिस्टम ‘अर्थात बीआरटीएस मार्ग उभारण्यात आले आहेत. मात्र, हा बीआरटीएस मार्ग डीपीआरप्रमाणे झालेलाच नाही. या मार्गावर सायकल पथ, पदपथ अस्तित्वात नाहीत. वृक्ष लागवड नाही. सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. बसथांबा मार्ग दर्शवणारे फलक चालू नाहीत. सुरक्षा रक्षक उपलब्ध नाहीत. पार्किंगबाबत सुविधा नाही. बहुतांशी ठिकाणी अतिक्रमण आहे. त्यामुळे बीआरटीएस मार्गाच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी दिसून येत आहे.

बीआरटीएस प्रकल्पाच्या उभारणीबाबत महापालिकेच्या विधी समिती, प्रभाग समिती, स्थायी समिती व मनपा सभेमध्ये मंजुरी दिलेला डीपीआर केव्हा तयार झाला. निविदा प्रक्रियाबाबतची जाहीर नोटीस केव्हा प्रसिद्ध झाली. सदर कामासाठी एकूण आलेल्या निविदांची यादी व मंजूर निविदेचे दर व संबंधित कंपनीचे नाव काय आहे. संबंधीत कंपनी बरोबर झालेला करारनामा?. डीपीआरप्रमाणे अंदाजपत्रकात किती तरतूद करण्यात आली. या कामास वाढीव मंजुरी देण्यात आली आहे का? दिली असल्यास ती कोणत्या मार्गाने वर्ग करण्यात आली. संबंधित कंपनीला अदा केलेल्या रकमेचा तपशील व सदर रक्कम देण्यापूर्वी तुम्ही केलेला पाहणी अहवाल, आदींबाबतच्या माहितीची मागणी करीत आहे. ती मला त्वरित मिळावी. यावर सूर्यवंशी यांनी आठ दिवसात बीआरटीएस मार्गावरील समस्या हटविण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात येईल, असे आश्वासन कस्पटे यांना दिले. याबाबत येत्या आठ दिवसात प्रत्यक्ष मार्गावरील समस्यांचे निराकारण न झाल्यास संबधित मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. त्यास महापालिकेचे प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात कस्पटे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button