TOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

“सुकेशकडून गिफ्ट घेणारी नोरा फतेही साक्षीदार, मग मी आरोपी कशी?” जॅकलिन फर्नांडिसचा ईडीला सवाल

  • सुकेश चंद्रशेखर हा २०० कोटी रुपयांच्या  खंडणी प्रकरणात मुख्य आरोपी आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने पीएमएलएच्या अपील प्राधिकरणासमोर याचिका केली आहे. माझ्यासह इतर सेलिब्रिटींप्रमाणेच नोरा फतेहीला सुकेश चंद्रशेखरने भेटवस्तू दिल्या होत्या. परंतु फक्त मलाच या प्रकरणात दोषी का ठरवलं जातंय, अशी विचारणा तिने या याचिकेत केली आहे. सुकेश चंद्रशेखर हा २०० कोटी रुपयांच्या  खंडणी प्रकरणात मुख्य आरोपी आहे.

“मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून भेटवस्तू मिळवणाऱ्या नोरा फतेहीसह इतर सेलिब्रिटींना या प्रकरणात साक्षीदार बनवलं गेलं, फक्त मलाच या प्रकरणी आरोपी म्हणून गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असं जॅकलिन फर्नांडिस म्हणाली. “माझ्या अकाउंटमधील फिक्स्ड डिपॉझिटच्या पैशांचा कोणत्याच गुन्ह्याशी कोणताही संबंध नाही. तसेच कोणत्याही गुन्ह्याच्या कथित रकमेचा वापर करून मी डिपॉझिट केले नाहीत. त्या माझ्या स्वतःच्या मेहनतीच्या आणि कायदेशीर उत्पन्नाच्या आहेत. तसेच मी सुकेशच्या संपर्कात येण्याआधीपासून ते डिपॉझिट खात्यात ठेवलेले होते,” असं जॅकलिनने याचिकेत म्हटलंय.

जॅकलिनने सांगितले की तिने चौकशीत नेहमीच तपास यंत्रणांना सहकार्य केले आहे आणि आजपर्यंतच्या सर्व समन्सला हजेरी लावली आहे. तिने तिच्याकडे सर्व माहिती ईडीला दिली आहे. या प्रकरणात तिची फसवणूक करण्यात आली आहे, याचा तपास करण्यात यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. मुख्य आरोपी चंद्रशेखरने वापरलेल्या मोडस ऑपरेंडीची ती बळी ठरली आहे. कोणतेही तथ्य नसलेलं हे प्रकरण फक्त युक्तिवादासाठीच आहे, असंही तिने याचिकेत म्हटलं आहे.

अपीलीय प्राधिकरणासमोरील तिच्या याचिकेत जॅकलिन फक्त भेटवस्तू स्वीकारल्याचं म्हटलंय. तसेच त्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचंही तिने सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button