TOP Newsपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या आयपीएल सामन्याची तिकीटे चढ्या दराने विकणा-या एकास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंटस या आयपीएल क्रिकेट सामन्याची तिकिटे चढ्या दराने विक्री केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. शनिवारी (दि. 7) रात्री हा सामना झाला. त्यावेळी दोघेजण तिकीट ब्लॅकने विकतानाचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

बाबासाहेब रामदास आमले (वय 26, रा. कुसगाव, ता. मावळ) याला अटक केली असून त्याच्यासह शुभम (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रेयस हनुमंत येलवार (वय 21, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी येलवार त्यांचे मित्र सुनील गायकवाड, हर्षल विश्वे, आर्यन गायकवाड असे गहुंजे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंटस हा आयपीएल क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते. स्टेडियमच्या गेटच्या आतमध्ये वेस्ट स्टँड जवळ गेट नंबर तीनला दोघेजण उभे होते. ते दोघे बेकायदेशीरपणे आयपीएल मॅचची तिकीट विक्री करीत होते. त्यांनी फिर्यादीकडून जास्त पैसे उकलण्याचा इराद्याने तिकिटांची विक्री केली. याची तक्रार फिर्यादी यांनी थेट पोलिसात केली. पोलिसांनी बाबासाहेब याला अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button