TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणेमुंबई

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुढच्या वर्षीच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, कसा असेल प्रवास, कुठला असेल मार्ग; वाचा

 मुंबई : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुढच्या वर्षीच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता आहे. शिवडी ते न्हावा शेवा दरम्यान २२ किलोमीटर लांबीच्या सागरी सेतूची बरीचशी कामं पूर्ण झाली आहेत. रस्त्यांचं बांधकाम फेब्रुवारी २०२३ मध्ये सुरू होईल आणि सप्टेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती MMRDA अधिकाऱ्यांनी दिली. तसंच प्रकल्पाचं ८४ टक्के काम पूर्ण करण्यात आलं आहे. शहरांमध्ये चांगली कनेक्टिव्हिटी करण्यासाठी MMRDA ने शिवडी – वरळी कनेक्टरवर काम सुरू केलं आहे, जे मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसह वांद्रे सी लिंकला जोडून थेट शहराच्या पूर्ण आणि पश्चिम सीफ्रंटला जोडेल. तसंच नवी मुंबईच्या शेवटाला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई – पुणे एक्सप्रेसवेशी जोडण्यासाठी ६ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रकल्प आखण्यात आला आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर

मुंबई ते नवी मुंबई जोडणारा देशातील सर्वात लांब सी लिंक मुंबई ट्रान्स हार्बरचं काम वेगात सुरू आहे. शिवडी ते न्हावा शेवादरम्यान २२ किलोमीटरचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक तयार होत आहे. सप्टेंबर २०२३ पर्यंत या सी लिंक प्रवासासाठी सुरू केला जाईल अशी माहिती आहे. २०१८ मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा खर्च जवळपास १८,३०० कोटी रुपये आहे. २०२२ पर्यंत हा पूल तयार होण्याची शक्यता होती. परंतु करोना काळात मजूरांची कमतरता तसंच इतर अनेक समस्या आल्याने आता २०२३ च्या सप्टेंबरपर्यंत हा पूल प्रवासासाठी सुरू करण्याचं लक्ष्य आहे.

MMRDA चा मोठा निर्णय

mmrda-

ज्या लोकांनी रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्प हे केवळ मोठ्या प्रमाणात उच्चभ्रू लोकांसाठी, केवळ कार चालकांना सेवा देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्या असल्याच्या तक्रारी केल्या आहेत, त्यांच्यासाठीही MMRDA ने मोठा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीएने सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर बससाठीही वेगळी लेन करण्याचा निर्णय घेतला आहे. या लेनवर किती मार्ग असतील आणि सुविधा कशा दिल्या जातील हे अद्याप निश्चित नाही. मात्र किमान गर्दीच्या वेळी चार मिनिटांच्या अंतराने बस सेवा शक्य असल्याचं बोललं जात आहे.

दोन महत्त्वाचे मार्ग

ब्रांद्रा – वरळी सी लिंक  शिवडी – वरळी कनेक्टरद्वारे मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि हार्बर रेल्वे ट्रॅकमार्गे शिवडी ते परेलमधील आचार्य दोंदे मार्ग, आंबेडकर रोड, परेलमधील मध्य आणि पश्चिम रेल्वे ट्रॅक, त्यानंतर सध्याच्या सेनापती बापट मार्ग पूलावरुन शेवटी वरळीत असा मार्ग असेल. हा मार्ग ४.३ किलोमीटर लांबीचा असेल. या मार्गाशिवाय मुंबई – पुणे एक्सप्रेस वेसाठी ६ किलोमीटर लांबीचा हा मार्ग असेल.

कमी वेळेत करता येणार प्रवास

हा पूल सुरू झाल्यानंतर दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानचा मोठा वेळ वाचेल. या पुलामुळे प्रवासी ९० मिनिटांत मुंबई ते पुणे प्रवास होऊ शकेल. तसंच मुंबई – गोवा मार्गावरील प्रवासही कमी वेळेत करता येईल. सध्या मुंबई – पुणे जाण्यासाठी पी डीमेलो रोड, फ्रीवे, सायन-पनवेल एक्सप्रेसवे, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, NH48, NH748 हे मार्ग आहेत. आता मुंबई-पुणे रस्ते मार्ग १५० किलोमीटर आहे. यासाठी जवळपास तीन तासांचा कालावधी लागतो.

कालावधी

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर जोडला जात आहे. हे दोन मार्ग जोडल्यामुळे मुंबई-पुणे, मुंबई-गोवा दरम्यानच्या प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. जवळपास ९० मिनिटांत हा प्रवास करता येईल. मुंबईसह, पुण्याजवळील लोणावळा, खंडाळा तसंच NH48 या दिल्ली – चेन्नई मार्गावर असलेल्या स्थानकांदरम्यानही प्रवास करणाऱ्यांनाही मोठा फायदा होईल, वेळ वाचेल. मुंबई – पुणे मार्गावरुन जाताना सध्या ३ तासांचा वेळ लागतो. हा वेळ कमी होऊन १ तास ३० मिनिटांपर्यंत होईल. तसंच मुंबई-गोवा मार्गावर सध्या ११ तासांचा कालावधी लागतो. या मार्गानंतर हा प्रवास ९ तास ३० मिनिटांत होऊ शकतो.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button