ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण विभागासाठी नव्याने पदनिर्मिती

पिंपरी चिंचवड | पिंपरी -चिंचवड महापालिका प्राथमिक शिक्षण विभागासाठी 8 क्षेत्रीय कार्यालयांनुसार 8 सहायक प्रशासन अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी सुधारित आकृतिबंधानुसार पदनिर्मिती करण्यात येणार आहे.प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला 2 आणि मुख्य कार्यालयाला 2 असे 18 पर्यवेक्षक नेमले जाणार आहेत. त्यापैकी 7 पदे मंजूर आहेत. उर्वरित 11 पदांची निर्मिती केली जाणार आहे. शिक्षण विभागाच्या अंतर्गत 105 शाळा आहेत. त्यासोबतच खासगी शाळांवर नियंत्रण करावे लागते. महापालिका आणि खासगी शाळा यांची माहिती वेळोवेळी शासनास देणे, शाळांची गुणवत्ता वाढविणे, माहिती संकलित करणे आदी कामे महापालिका प्राथमिक विभागामार्फत करावी लागतात.

या कामकाजात सुसूत्रता यावी, यासाठी प्राथमिक शिक्षण विभागात क्षेत्रीय कार्यालयानुसार पदनिर्मिती केली जाणार आहे. नियमानुसार तसेच शासनाकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती करण्याचे नियोजन आहे. तर, जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षण अधिकारी अशी बरीचशी पदे असतात. त्याच धर्तीवर क्षेत्रीय कार्यालयानुसार पदनिर्मिती होत आहे. याबद्दल शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. परंतु, हा आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर त्या ठिकाणी होणारी भरती ही सेवेत असलेल्या शिक्षकांमधून त्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, शिक्षण क्षेत्रात योगदान, तसेच महापालिकेकडील शिक्षक कर्मचारी यामधून व्हावी. या पदनिर्मिती निर्णयामुळे शिक्षकांनाही पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील. त्यासोबतच शिक्षण विभागातही सुसूत्रता येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button