ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

डिजिटलमुळे प्रत्येकाला जगातील एक मोठा उद्योगपती होण्याची संधी आहे- सुरेश प्रभू

मुंबई | महाईन्यूज |

या प्रत्येकाला जगातील एक मोठा उद्योगपती होण्याची संधी आहे. पूर्वी उद्योगपती होण्यासाठी राजकीय संबंध, भांडवल, मार्केटिंग अशा अनेक गोष्टी कराव्या लागायच्या. मात्र आता याची कशाचीही गरज नाही. आज जवळ काही नसणारे लोक डिजिटल माध्यमाचा वापर करून जगातील पॉवरफुल लोक बनले आहेत. त्या लोकांनी डिजिटल टेक्नॉलॉजी आत्मसात केल्या. आणि त्याचा वापर करून बिझनेस मॉडेल बनवला. म्हणून ही फार मोठी संधी आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी केलंय.

डिजिटल युग आता आलेलं आहे आणि भविष्यात नव्या रुपात येणार देखील आहे. आलेलं जे डिजिटल युग आहे ते हिमनगासारखे आहे. आणि येणारे युग हे कल्पनेपलीकडेही असेल. जगात जे बदल घडत आहेत त्यामध्ये भारत आणि महाराष्ट्र वेगळा राहू शकत नाही. टेक्नॉलॉजीमध्ये जे बदल घडत आहेत क्रांती होणार आहे त्यात आपण असणार आहोत की नाही, याबाबत कुणीही सांगू शकणार नाही. डिजिटल क्रांतीमुळे ही संधी प्रत्येक देशाला, राज्याला आणि व्यक्तीला देखील उपलब्ध झाली आहे, असंही ते म्हणाले.

संशोधकांच्या मते पुढच्या दहा वर्षात आजच्या फॉरचून फाउण्डेड कंपन्या आहेत, त्यापैकी 80 ते 90 टक्के कंपन्या बंद पडणार आहेत. या कंपन्या गेल्यानंतर त्यांच्या जागी डिजिटल प्लॅटफॉर्म वापरून बिझनेस मोडेल तयार करणाऱ्या कंपन्या येतील. त्यामुळे आता देश, राज्य नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला सुद्धा यात सहभागी होण्याची संधी आहे, असं देखील सुरेश प्रभु म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button