ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सांगलीतील अनेक गावांना खोल भागातील पाणी उपसण्यासाठी ‘पंपसेट’चे वाटप

पिंपरी चिंचवड | सांगली जिल्ह्यातील बहुतांश गावांना पावसाळ्यात पुराचा फटका बसत असल्याने पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूर शहरातील विलो मॅथर अँण्ड प्लॅट कंपनीने सीएसआर फंडातून ट्रॉलीवर बसवलेला पंपसेट तयार केला आहे. सांगलीतील पलुस तालुक्यातील बुर्ली, पुणदी, भिलवडी व अंकलखोप या गावांना देण्यात आला. खोल भागातील पाण्याचा उपसा करून परत नदीत सोडण्यासाठी पंपचा उपयोग होणार आहे.विलो मॅथर अँण्ड प्लॅट पंपस् प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून “Flood control Trolley mounted pumping system” पंपस् सेट हंस्तातर सोहळा नुकताच संपन्न झाला. सांगली जिल्ह्यातील बहुतांशी गावात पावसाळ्यात कृष्णा नदीच्या पुराचा फटका बसतो. त्यात काही गावात पुर ओसरल्यानंतर खोल भाग असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे गावात लोकांमध्ये रोगराई पसरून त्यांचे आरोग्य खराब होते. या गोष्टीला दर वर्षी सामोरे जावं लागते.

यावर उपाययोजना म्हणून पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूर शहरातील विलो मॅथर अँण्ड प्लॅट कंपनीने ट्रॉलीवर बसवलेला पंपसेट तयार केला आहे. याचा उपयोग खोल भागातील पाण्याचा उपसा करून परत नदीत सोडण्यासाठी होणार आहे. हा पंपसेट डिझेल इंजीन जनरेटरशी संलग्न असल्याने पावसाळ्यात विज नसली तरी वापरता येईल.

पलूस तालुका मधील बुर्ली, पुणदी, भिलवडी व अंकलखोप या गावात वर निर्देश केलेला पंपसेट “कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिलिटी” म्हणजेच व्यावसायिक सामाजिक जबादारी योजनेअंतर्गत देण्यात आले. या समारंभास कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हेमंत वाटवे, फायनान्स हेड श्रीकांत शिरोडकर, परचेस हेड अजित इंगळे, सेल्स हेड अनिल केशवानी, सेंथिलकुमार एस आणि इतर अधिकारी वर्ग व रोटरी क्लब सांगलीचे सेक्रेटरी रामचंद्र चितळे, खजिनदार प्रमोद पाटील यांच्यासह उमेश स्वामी आणि अंकलखोप, बुर्ली,पुणदी, व भिलवडी गावातील ग्रामपंचायत मधील सरपंच व सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button