एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन लगेच देणार : अनिल परब
एसटी कर्मचाऱ्यांनी कुठलंही टोकाचे पाऊल उचलू नये, आम्ही त्यांच्या वेतनासाठी बँकेकडे कर्ज मागितले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना लगेच एक महिन्याचं वेतन देणार आहे, तर अजून एका पगाराची व्यवस्था दिवाळी आधी करण्याचा प्रयत्न आहे. अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना परब म्हणाले, आज एका तासात कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे वेतन मिळेल, त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये. तात्पुरत्या संकटातून आपण नक्की मार्ग काढू. दुःखी होऊन असं कोणतंही टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबाला त्याचा त्रास होतो. कुटुंब रस्त्यावर येते. दिवाळी आधी एक पगार मिळेल आणि दिवाळीनंतर एक पगार मिळेल, असेही ते म्हणाले.
या अगोदर एसटीला राज्यशासनाने मदत केली आहे. यापुढेही करेल. आज सकाळपासून त्याबाबत बैठक सुरू आहे. एका पगाराचा प्रश्न सुटला आहे. आणि एका पगाराचा प्रश्न दिवाळीपर्यंत सुटेल. असेही अनिल परब म्हणाले.