breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्रराष्ट्रिय

नसीरुद्दीन शाहांनी दुसऱ्यांदा मागितली पाकिस्तानची माफी, नमकं प्रकरण काय?

दिल्ली : बॉलिवूड अभिनेते नसीरूद्दीन शाह आपल्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ते त्यांच्या या विधानामुळे सातत्याने चर्चेत असतात. कागि दिवसांपूर्वी केलेल्या विधानांमुळे चांगलाच गोंधळ झाला आहे. त्यांना पाकिस्तानची एक नाही तर दोन वेळा माफी मागावी लागली आहे.

नसीरूद्दीन शाहांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, पाकिस्तानात पूर्वीच्या तुलनेत आता सिंधी भाषा बोलली जात नाही. पाकिस्तानातील सिंधी समाजातील काही कलाकारांनी यावर आक्षेप घेतला होता. आता नसीरूद्दीन शाह यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. दुसरीकडे, भारतातील मराठी भाषेचा संबंध फारसीशी जोडल्यावरही त्यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी माफी मागितली होती. आता सिंधी भाषेबद्दलच्या वक्तव्यावरून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी माफी मागितली आहे.

हेही वाचा – FASTag शिवाय टोल नाका ओलांडल्यास किती दंड होऊ शकतो?

नसीरूद्दीन शाह यांनी म्हटलं आहे की, ठीक आहे मी पाकिस्तानमधील संपूर्ण सिंधी भाषिक लोकांची माफी मागतो. माझ्या चुकीच्या मतामुळे त्यांचा अपमान झाला असेल. मी मान्य करतो की माझी माहिती अपुरी होती. पण एवढ्यासाठी मला सुळावर चढवणं गरजेचं आहे का? खरंतर इतकी वर्षं ज्ञानी व्यक्ती म्हणून परिचीत झाल्यानंतर आता बेजबाबदार आणि वैचारिक असल्याचं भासवणारा म्हणवून घ्यायची मला मजा येतेय. हा खरंच दखल घेण्यासारखाच बदल आहे, असं नसीरूद्दीन शाह यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button