breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ नाव कसे मिळाले? जाणून घ्या ‘या’ शब्दाचा अर्थ

मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. बिपरजॉयने अत्यंत तीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीत प्रवेश केला आहे. चक्रीवादळाने मार्ग बदलल्यामुळे आता भारतालाही (India) धोका निर्माण झाला आहे. मार्ग बदलल्यानंतर आता बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र तुम्हाला हे माहित आहे का? अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ नाव कडे दिले? आणि त्याचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊयात..

बांगलादेशने या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ’ असे नाव दिले आहे. याचा अर्थ बंगालीमध्ये ‘आपत्ती’ असा आहे. अहवालानुसार हे नाव जागतिक हवामान संघटनेच्या देशांनी २०२० मध्ये स्वीकारले होते. यामध्ये बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रासह उत्तर हिंदी महासागरात निर्माण होणाऱ्या सर्व उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचा समावेश आहे. कारण चक्रीवादळांना प्रादेशिक नियमांच्या आधारे नाव दिले जातात.

हेही वाचा – नसीरुद्दीन शाहांनी दुसऱ्यांदा मागितली पाकिस्तानची माफी, नमकं प्रकरण काय?

WMO आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन (ESCAP) च्या सदस्य देशांकडे चक्रीवादळांना नाव देण्याची एक विशिष्ट प्रणाली आहे. अटलांटिक आणि दक्षिणी गोलार्ध मधील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) सदस्य राष्ट्रांनी दिलेल्या नावांच्या आधारे वर्णमालानुसार नावे दिली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button