breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

FASTag शिवाय टोल नाका ओलांडल्यास किती दंड होऊ शकतो?

FASTag : सध्या हायवे-एक्स्प्रेस वेवर गेल्यास तेथील टोल नाक्यावर टोल शुल्क फास्टॅगद्वारेच भरले जाते. अशा परिस्थितीत जर एखादी व्यक्ती FASTag शिवाय जात असेल तर त्याला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि अशी परिस्थिती टाळण्यासाठी काय करावे लागेल? FASTag चा वापर प्रत्येक वाहन मालकासाठी अनिवार्य आहे. तसे न केल्यास वाहनधारकांना दंड म्हणून दुप्पट टोल भरावा लागतो. अशा परिस्थितीत, आपल्या वाहनावर वेळेत FASTag लावण्याचा सल्ला दिला जातो.

समजा तुमच्या वाहनावर FASTag लावलेला नसेल आणि तुम्ही एक्स्प्रेस वेवर निघालात आणि तिथे टोल लागला असेल, तर अशा परिस्थितीत तुमचे काय होईल? दरम्यान, नियमांनुसार जर तुमच्याकडे FASTag नसेल, तर तुम्हाला टोल टॅक्सच्या दुप्पट रक्कम भरावी लागेल . उदाहरणार्थ, जर ₹९० हा फास्टॅग टोल असेल, तर पासशिवाय ₹१८० केले जातील. म्हणजे तुम्हाला टोल टॅक्सच्या दुप्पट रक्कम भरावी लागेल.

हेही वाचा – Ashadi Wari 2023 : निर्मलवारीसाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज

FASTag एक इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम आहे, जी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) टेक्नोलॉजीवर आधारित आहे. हा टॅग अधिकृत बँकेद्वारे केला जातो आणि ऑनलाइन माध्यमातून टोल वसूल केला जातो. याच्या वापरामुळे तुम्ही टोल टॅक्सवर लांब रांगेत उभे न राहता टोल टॅक्स भरता. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाक्यावर बसवलेले रिडर्स कारच्या विंडस्क्रीनवर चिकटवलेला टॅग स्कॅन करतात आणि लिंक केलेल्या बँक अकाउंटद्वारे शुल्क कापले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button