breaking-newsमनोरंजन

सोनमकडून जान्हवीची पाठराखण, कतरिनाला दिले सडेतोड उत्तर

गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री कतरिना कैफ तिचा आगामी चित्रपट ‘भारत’च्या प्रमोशमध्ये व्यग्र आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये कतरिनाने अभिनेत्री जान्हवी कपूरच्या जिमच्या कपड्यांवरुन वक्तव्य केले. जान्हवी जिमला जाताना फार तोकडे कपडे परिधान करते पण मला तिची चिंता वाटते असे कतरिना म्हणाली. त्यावर जान्हवी कपूरने कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. परंतु तिची बहिण अभिनेत्री सोनम कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे कतरिनाला प्रत्युत्तर दिले असल्याचे समोर आले आहे.

जान्हवी कपूरच्या कपड्यांवर कतरिनाने केले वक्तव्य सोनम कपूरला फारसे आवडलेले दिसत नाही. सोनमने जान्हवीची पाठराखण करत एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये जान्हवीने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि डेनिम शॉर्ट परिधान केले आहे. त्यामध्ये ती अत्यंत सुंदर आणि ग्लॅमर अंदाजात दिसत आहे. फोटो शेअर करताना सोनमने एक कॅप्शन दिले आहे. ‘ती असे कपडेसु्द्धा परिधान करते आणि सुंदर दिसते’ असे लिहिले. ही स्टोरी पाहता सोनम कपूरने कतरिनाला प्रत्युत्तर दिले असल्याचे म्हटले जात आहे.

मुलाखतीदरम्यान कतरिनाने धडक गर्ल जान्हवी कपूरवर कमेंट केली होती. ‘जान्हवी जिमला जाताना फार तोकडे कपडे परिधान करते असे मला वाटते. ती मी एकाच जिमला जातो. कधीकधी आम्ही एकत्र जिम करतो. परंतु काही वेळा मला तिची काळजी वाटते’ असे कतरिना म्हणाली होती.

सध्या जान्हवी कपूर गुंजन सक्सेना या बायोपिकमध्ये दिसणार आहे. चाहत्यांना या चित्रपटाची फार उत्सुकता आहे. तसेच करण जोहरच्या ‘तख्त’ या चित्रपटात देखील ती दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button