breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबई

‘तरूणांनी आठवड्याला ७० तास काम करावे’; नारायण मुर्ती यांचा सल्ला

मुंबई : थ्री वन फोर कॅपिटलच्या पॉडकास्ट ‘द रेकॉर्ड’मध्ये इन्फोसिसचे सहसंस्थापक एन आर नारायण मूर्ती यांनी युवा पिढीला एक मोलाचा सल्ला दिला आहे. भारतात कार्य करणाऱ्यांची उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. हे वाढवण्यासाठी देशातील तरुणांनी दर आठवड्याला ७० तास काम करावे, असं नारायण मुर्ती म्हणाले. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

नारायण मुर्ती म्हणाले, राष्ट्र उभारणीपासून तंत्रज्ञान, आजची तरुणाई आणि त्यांची कंपनी इन्फोसिस अशा अनेक विषयांवर त्यांनी आपली मते मांडली. हे पॉडकास्टसुद्धा यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. सरकारमधील भ्रष्टाचार आणि नोकरशाहीतील दिरंगाई ही कार्याची उत्पादकता कमी होण्याची प्रमुख कारणे आहेत. भारताची कार्य उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. जोपर्यंत आपण सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार कमी करत नाही आणि नोकरशाहीतील दिरंगाईला आळा घालत नाही, तोपर्यंत आपण ज्या देशांनी प्रचंड प्रगती केलीय, त्यांच्याशी स्पर्धा करणे अवघड आहे.

हेही वाचा – हृदयरोगापासून दूर राहायचे असल्यास आहारात करा ‘या’ डाळींचा समावेश

देशाची कार्य उत्पादकता वाढवण्यासाठी तरुणांना पुढे यावे लागेल. मी तरुणांना आवाहन करतो की, पुढे येऊन हा देश माझा आहे म्हणा. मला आठवड्यातून ७० तास काम करायला आवडेल. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनीने हे केले होते. बर्‍याच वर्षांपासून दोन्ही देशांनी आणि त्यांच्या नागरिकांनी काही अतिरिक्त तास काम केले. भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे देशाला प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे नेण्याची जबाबदारीही तरुणांच्या खांद्यावर आहे. देशाची कार्यसंस्कृती बदलली पाहिजे. ते शिस्त, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयावर आधारित असले पाहिजे. तसे झाले नाही तर सरकार फार काही करू शकणार नाही, असं नारायण मुर्ती म्हणाले.

आपल्याला शिस्तबद्ध राहून कार्याची उत्पादकता वाढवायची आहे. आपण हे केल्याशिवाय सरकारही आमचे काही भले करू शकणार नाही. जशी लोकांची संस्कृती असेल, सरकारही तशीच असणार आहे. म्हणून आपण स्वतःला अत्यंत दृढनिश्चयी, शिस्तप्रिय आणि मेहनती लोकांमध्ये बदलले पाहिजे. बदलाची सुरुवात तरुणांपासून व्हायला हवी, असंही नारायण मुर्ती म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button