breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#CoronaVirus : विभागीय आयुक्तांनी घेतला पिंपरी-चिंचवडमधील परिस्थितीचा आढावा

  • कोरोना आपत्तीचा एकजुटीने सामना करूया 
  • विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि पूर्वकाळजी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून सुक्ष्म नियोजन केले जात असून नागरिकांनी घाबरुन जावू नये, मात्र, पूर्वकाळजी घ्यावी. प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य करावे आणि या आपत्तीचा एकजुटीने सामना करूया,असे  आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

कोरोनाबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आज आढावा घेतला. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक नांदापूरकर आदी यावेळी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे, त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. तसेच, त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा, जेणेकरुन समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्यांची ओळख पटेल. बाधित प्रवाशी आढळल्यास त्यांच्या प्रवासाची माहिती, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती विचारपूस करणा-या पथकाने तातडीने घ्यावी. तसेच, परदेशातून प्रवास करुन आलेले व ज्यांना बाधा झाली, अशा प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या निकटवर्तीयांची तपासणी केली जाईल. उद्यापासून विमानाने आलेल्या सर्व प्रवाशांना 24 तास देखरेखीखाली ठेवले जाणार असून त्यासाठी परिपूर्ण व्यवस्था काळजीपूर्वक करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.

शहरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच सार्वजनिक ठिकाणे येथे गर्दी नियंत्रण करताना महापालिकेच्या वतीने व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी, असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले,  स्थानिक पातळीवर महापालिका प्रशासनाने नागरिकांमध्ये कोरोना आजाराविषयी असलेली भीती दूर करण्यासाठी जागृती करावी. कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवेसाठी कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण तातडीने देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच कोरोना प्रतिबंधाबाबत उपाययोजनासंदर्भात प्रत्येक अधिका-यांने समन्वय ठेवून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी तयार करण्यात आलेल्या प्रत्येक पथकाचे कामकाज व जबाबदा-या याबाबतचीही सविस्तर माहिती घेतली.

पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी महापालिकेच्या सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button