breaking-newsराष्ट्रिय

धक्कादायक! शिक्षिकेने केले १४ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण

चंदीगड : एका ३४ वर्षांच्या शिक्षिकेने १४ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पीडित मुलाच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेला अटक केली आहे.

राम दरबार कॉलनी येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला १४ वर्षांचा मुलगा आणि एक लहान मुलगी आहे. आरोपी शिक्षिकाही त्याच परिसरात राहते. तिला देखील दोन लहान मुले आहेत. १० वीत शिकणाऱ्या मुलाला आणि लहान मुलीला शिकवणीसाठी शिक्षिकेकडे पालकांनी पाठवले. काही दिवसांनी शिक्षिकेने मुलाला क्लासला उशिरा पाठवायला सांगितले. तो एकटा आला तर त्याच्याकडे लक्ष देता येईल असे तिने मुलाच्या आई -वडिलांना सांगितले होते.

गेल्या ५ महिन्यापासून ती मुलाचे लैंगिक शोषण करत होती. मुलाशी संपर्क साधता यावा यासाठी तिने मुलाला एक सिम कार्ड दिले होते. परीक्षेत मुलाला कमी गुण मिळाल्याने त्याच्या आईने शिक्षिकेची भेट घेतली आणि मुलाला तिच्याकडे क्लासला पाठवणे बंद केले. या प्रकाराने शिक्षिका संतापली. शिक्षिकेने एप्रिलमध्ये पुन्हा मुलाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. मुलाला माझ्याकडे क्लासला पाठवा, यासाठी तिने तगादा लावला. सोमवारी तिने शेवटचं मला भेटायला या, असे मुलाच्या आई-वडिलांना सांगितले. यानुसार पीडित मुलगा आणि त्याचे आई- वडील शिक्षिकेच्या घरी गेले. यानंतर शिक्षिकेने मुलाला एका खोलीत डांबले आणि त्याला माझ्या घरीच राहू द्या, मी त्याला तुमच्या घरी जाऊ देणार नाही, अशी धमकी दिली. शिक्षिकेने मुलाच्या आई- वडिलांशी वाद घातला आणि कफ सिरप पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अखेरीस मुलाच्या आई वडिलांना पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button