breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

हृदयरोगापासून दूर राहायचे असल्यास आहारात करा ‘या’ डाळींचा समावेश

Heart Attack : हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रोटीन, फायबर आणि इतर पोषक आहार घेण्याची नितांत आवशक्यता असते. ही पोषकतत्वे मिळाली तरच हृदयाचं आरोग्य चांगलं होण्यास मदत होते. आपल्या रोजच्या आहारात डाळीचं खूप मोठं महत्व आहे. डाळींच्या सेवनाने पचनसंस्था चांगली होऊन अनेक आजारांपासून वाचण्यास मदत होते. तर पाहुयात कोणत्या आहेत त्या डाळी?

मसूर डाळ : मसूरमध्ये फायबर अधिक प्रमाणात असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यात आणि हार्ट अ‍ॅटॅकचा धोका कमी करण्यास देखी मसूर डाळ फायदेशीर ठरू शकते. व्हिटॅमिन बी, फोलेट, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असे महत्वाचे मानले जाणारे पोषक घटक यात असतात.

चणा डाळ : या डाळीत प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते, हेल्दी हृदयासाठी प्रोटीन खूप आवश्यक आहेत. प्रोटीन शरीरातील स्नायू तयार करण्यास आणि मजबूत करण्यास देखील मदत करत असतात. तसेच या डाळीत फायबर असल्यामुळे पचनसंस्था चांगली राहण्यास आणि बद्धकोष्ठतेला दूर ठेवण्यात देखील याचा महत्वाचा सहभाग आहे.

हेही वाचा – ‘..तर मोदींचं विमान शिर्डीत उतरू दिलं नसतं’; मनोज जरांगे पाटील यांचं विधान 

मूग डाळ : मुगाच्या डाळीचा आहारात समावेश केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि कोलेस्ट्रॉल देखील कमी होतो. परिणामी हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. या डाळीच्या नियमित सेवनाने रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह चांगला राहतो तसेच हृदयाचे स्नायू देखील बळकट होण्यास मदत होते.

तूर डाळ : तूर डाळमध्ये प्रथिने, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, रोजच्या आहारातील फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात, जी हृदयाच्या आरोग्यासाठी मोठी फायदेशीर मानली असतात. यात असणारे अँटिऑक्सिडंट्स हृदयाला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यास मदत करतात. तूर डाळीचे नियमित आहारात सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.

संबंधित आर्टिकलच्या माध्यमातून देण्यात आलेली माहिती ही इंटरनेटच्या मदतीने घेण्यात आलेली आहे. यातील कोणत्याही माहितीची जबाबदारी आम्ही घेत नाही. तसेच आरोग्यविषयक चांगल्या सवयीच्या माहितीसाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button