ताज्या घडामोडीमुंबई

इलेक्ट्रिक वाहनासंबंधित आढळणारी मिथके

गेल्या काही महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव अवाढव्य पद्धतीने वाढल्याची तक्रार कुणी केली नसेल, असे घडलेच नसेल. (विशेष म्हणजे, काही शहरांमधील पेट्रोलचे भाव प्रती लिटर 100 रुपयांपल्याडही पोहोचले आहेत.) त्याचबरोबर टेस्ला भारतीय बाजारात उतरत असून इलेक्ट्रिक वाहने चालकांना तुलनेत चांगली वाटतायेत. मग ग्राहक दुसरा पर्याय स्वीकारत नाहीत? आणि म्हणूनच ईव्ही अर्थात ईलेक्ट्रिक व्हेईकलविषयीच्या सामान्य मिथकांवर चर्चा करणे आवश्‍यक ठरणार आहे.

ईव्हीकडे वळण्याचा विचार करणाऱ्यांना सतावणारी सर्वसामान्य चिंता म्हणजे दर काही मिनिटांनी वाहन चालवण्यासाठी इंधन भरावे लागू शकते. ईव्ही चार्जिंगसाठी खूप तास लागू शकतात. आपल्याकडे उत्तम पार्किंग झोन किंवा गॅरेज असेल तर बेसिक 240 व्ही पॉवर आउटलेटद्वारे ईव्ही बहुतांशवेळा एका रात्रीत किंवा काही रात्रींमध्ये चार्ज होतात. सध्याचे सुपरचार्जर्स पूर्ण चार्ज होण्यासाठी 30 ते 60 मिनिटे लागतात. ईव्हीसाठी पुरेशी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने जोरदार पावले उचलत, अनेक कंपन्या त्यांच्या पार्किंगच्या जागेत चार्जिंग स्टेशन बसवण्याचा विचार
करीत आहेत.

आज लक्झरी बाजारात बहुतांश ईव्ही उच्च किंमतीत आहेत. मात्र हे चित्र बदलत आहे. विशेषत: भारतात, सवलतींद्वारे त्यांची किंमत कमी केली जात आहे. अमेरिकेने केलेल्या एका तपासणीनुसार, पेट्रोलवर चालणाऱ्या कारच्या तुलनेत ईव्ही निम्म्या किंमतीत येतात. ईव्हीचे थोडेच पार्ट काढता येतात. प्रभावी कूलिंग सिस्टिम आणि ऑइल नसल्यामुळे देखभालीची किंमतही कमी असते. जसे की, एमजीच्या विजेरी वाहनांमध्ये एमजी ईशील्ड आणले आहे.

ईव्हीसाठीची बॅटरी महाग आणि ती वेळोवेळी बदलावी लागते :

इलेक्ट्रिक वाहन आणि अनेक पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरण्यात येणाऱ्या बॅटरीचा एक प्रकार म्हणजे लिथियम-आयन बॅटरी. लिथियम- आयन बॅटरी इतर पर्यायांपेक्षा अधिक सुरक्षित आहे. बॅटरी उत्पादकांना ग्राहकांच्या सुरक्षेकरिता बॅटरीत बिघाड झाल्यास, उपायांबद्दल हमी देणे आवश्‍यक असते. लिथियम-आयन बॅटरीची किंमतीही वेगाने कमी होत आहेत आणि भारतात उच्च कामगिरी करणाऱ्या बॅटरींमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. सध्या, ईव्ही बॅटरी 241,000 किमी धावल्यानंतरही 90 % पर्यंत क्षमता देतात. सामान्य भारतीय ड्रायव्हर वरीलप्रमाणे अंतर पार करत नाही. जे एवढे अंतर पार करतात त्यांच्यासाठी ईव्ही कंपन्या बॅटरीवर 8 वर्षाची गॅरेंटी देतात.

ईव्ही विकत घेण्याचे प्रमाण कमी आहे. यामागील आणखी एक गैरसमज म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा शहराबाहेर जाण्यासाठी ही वाहने योग्य नाहीत. मात्र नव्या काळातील, जागतिक पातळीवरील इलेक्ट्रिक वाहने प्रचंड सक्षम बॅटरीयुक्त असून ते 300 किमी अंतरावर प्रवास करण्याची हमी देतात. आघाडीच्या जागतिक ईव्ही कंपन्या बाजारात प्रवेश करत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झालेल्या ईव्ही सुविधांचे स्थानिकीकरण करून ते बाजारात परिवर्तन घडवत आहेत.

पूर्वी बहुतेक इलेक्ट्रिक वाहनांविषयी हा समज होता. मात्र सध्या तर ईलेक्ट्रिक रेसकारसुद्धा अस्तित्वात आहेत. बॅटरीतील चार्जिंग जपून ठेवण्यासाठी बहुतांश कारचे निर्माते टॉप स्पीडला मर्यादा ठेवतात. त्यामुळे बहुतांश ईव्ही इलेक्ट्रिक मोटर स्पीड कमी करण्याच्या उद्देशाने ठराविक प्रमाणात डिझाईन केलेल्या असतात. हे प्रमाण चाकांपर्यंत प्रसारीत होण्यापूर्वी सामान्यत: 8000 ते 10,000 आरपीएम दरम्यान असते. ईव्हीमध्ये त्वरीत शक्ती निर्माण करण्याची क्षमता असते. पॅसेंजर वाहनांमध्येदेखील ईव्ही 2.5 सेकंदात 0-96 केएमपीएच वेग घेऊ शकतात. 2022मध्ये अनेक इलेक्ट्रिक वाहने बाजारात येत आहेत.

गेल्या काही वर्षांत जगभरातील वाहन उद्योगातील परिवर्तनाने प्रचंड वेग धारण केला आहे. 2017 ते 2018 मध्ये जागतिक ईव्ही विक्री नाट्यमयरित्या 65% ने वाढली. या काळात जगभरात 21 लाख दशलक्ष वाहने तयार झाली. 2020-21 मध्येदेखील ही वाढ सुरूच राहिली. कोरोना विषाणूचा नव्याने झालेल्या उद्रेकामुळे 2020 मधील पहिल्या तिमाहीत विक्री घटली व ती 25% ने कमी झाली. या अडचणीनंतरही ब्लूमवर्ग न्यू एनर्जी फायनान्स (बीएनईएफ) नुसार ईव्हीची मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. यात सुधारीत बॅटरी, चार्जिंगची उपलब्ध सुविधा, नवी बाजारपेठ आणि कंबनशन इंजिन (आयसीई) वाहनांनुसार किंमत अशी वैशिष्ट्‌ये आहेत. 2025 पर्यंत जगभरातील प्रवासी वाहनांची विक्री 10% ने वाढेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2030 मध्ये ती 28 टक्के तर 2040 पर्यंत 58 टक्क्‌यांनी वाढेल.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button